काससह भांबवली-वजराई धबधबा परिसराचा पर्यावरणपूरक पर्यटन विकास आराखडा सातारा वन विभागाच्या कार्यालयाने तयार केला होता. हा आराखडा नंतर कोल्हापूर व तेथून नागपूर कार्यालयात दाखल झाला.
सातारा : आगामी वर्षा पर्यटनावर लक्ष केंद्रित करत सातारा वन विभागाने (Satara Forest Department) कास (Kas Pathar), ठोसेघर, भांबवली-वजराई धबधब्यासह इतर निसर्गरम्य भागांना जोडणाऱ्या निसर्गवाटांच्या मजबुतीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. या कामांमुळे निसर्गवाटा अधोरेखित होण्यासह त्याठिकाणाहून जाताना पर्यटकांना होणारा धोका कमी होणार आहे. यासाठी वन विभागास मिळणाऱ्या निधीतून प्राथमिक टप्प्यातील कामे पूर्णत्वाकडे आहेत.