
सातारा : कोठडीतून पळालेला आणखी एक ताब्यात
औंध : औंध पोलिस ठाण्यातील कोठडी तोडून काल पहाटे पाच संशयित आरोपी पळाले होते. त्यापैकी दोघांना काल पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तर आज आणखी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पळालेल्या संशयित आरोपींना पकडण्यासाठी दहा पथकांनी औंधसह आसपासचा परिसर पिंजून काढण्यास सुरवात केली असता पाचपैकी तीन आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. राहुल पदु भोसले (वय२८, रा.वाजुळ पारगाव, मु.पो.बाबुर्डी, ता.जि.नगर) यास औंधनजीक वरुड भागातून ताब्यात घेतले.
सचिन सुभाष भोसले (वय २३, रा.माहीजळगाव, ता.कर्जत, जि.नगर) याला औंध येथे असणाऱ्या खोरी या शिवारातून ताब्यात घेतले आहे. आज अजय सुभाष भोसले (वय२२, रा.माहीजळगाव, ता.कर्जत, जि.नगर) याला औंधनजीक खबालवाडी परिसरातून दुपारी साडेचार वाजता ताब्यात घेतले आहे. औंध पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस उपनिरीक्षक गंगाराम केंद्रे यांच्या पथकाला मंगळवारी तिसरा आरोपी पकडण्यात यश आले. अन्य दोन आरोपी लवकरच ताब्यात घेऊ, असा विश्वास औंध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे यांनी व्यक्त केला आहे.
Web Title: Satara Fugitive Arrested Recaptured
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..