काय सांगता... आजपासून आरटीओचे संपूर्ण कामकाज

कर्‍हाड आरटीओ
कर्‍हाड आरटीओ
Updated on: 

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनामुळे येथील आरटीओ कार्यालयाचे कामकाज मर्यादित स्वरूपातच सुरू होते. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत होती. त्याचा विचार करून शासनाने परिवहन विभागाला सर्व कामकाज करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आरटीओ कार्यालयात नवीन वाहनांची नोंदणीचे, वाहन हस्तांतरणाचे काम सुरू करण्यात आले.

सध्या कोरोनासाठीच्या नियमात शिथिलता देण्यात आली आहे. त्यानंतर शासनाने परिवहन विभागाला उर्वरित कामकाजही सुरू करावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता वाहनधारकांना परवाना व वाहनविषयक कामासाठी सारथी 4.0 व वाहन 4.0 या प्रणालीवर आगाऊ वेळ घेण्याची तरतूद ठेवलेली आहे. शिकाऊ परवान्यासाठी संगणकीय चाचणी घेताना दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर, अर्जदाराला मास्क व हॅंडग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश, पक्‍क्‍या परवान्यासाठी चाचणी घेण्याआधी वाहन सॅनिटाईज करणे, ड्रायव्हिंग स्कूलचे वाहन प्रत्येक चाचणी अगोदर सॅनिटाईज करणे, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी आलेल्या वाहनांचे सॅनिटायझेशन केल्यानंतरच चाचणी घेण्यात येणार आहे.

त्याचबरोबर परवाना, वाहन व परवाना विषयक कामकाजाबाबत दैनंदिन कोटा निश्‍चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार नवीन शिकाऊ परवान्यासाठी 40, पक्‍क्‍या परवान्यासाठी 40 आणि योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी 15 जणांनाच रोज संधी दिली जाणार आहे. योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरणाच्या नियोजित दिनांकाच्या एक दिवस अगोदर वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने निळकंठ पाटील यांनी दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nhalewadi Leopard Attack Two Year Old Dies in Satara Citizens Demand Action Against Forest Officials Over Safety Lapses in Area
Satara Murder Case Old Dispute Turns Deadly as 29 Year Old Man Dies After Iron Hoe Blow Two Suspects in Custody
Satara Leopard Attack Child Dies in Nhalewadi After Leopard Drags 26 Month Old Boy Away Villagers Demand Action
Sugar Mill Opening
Marathi News Esakal
www.esakal.com