esakal | भाविकांनो.. साताऱ्यातील 'या' मानाच्या गणपतीचे घेता येणार वर्षभर दर्शन, कोणी घेतला निर्णय वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

भाविकांनो.. साताऱ्यातील 'या' मानाच्या गणपतीचे घेता येणार वर्षभर दर्शन, कोणी घेतला निर्णय वाचा

दर्शनस्थळी वेळोवेळी सॅनिटायझेशन केले जाणार असून दर्शनास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी सॅनिटायझरची सोय केली आहे. कोणत्याही व्यक्तीस दर्शन झाल्यावर दर्शनस्थळी थांबता येणार नाही, तसेच शासनाने केलेल्या आवाहनानुसार मूर्तीला नारळ, पेढे, हार, ओटी व इतर वस्तू वाहण्यास मनाई असल्याने अशा वस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत, याची भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन राहुल परदेशी यांनी केले आहे.

भाविकांनो.. साताऱ्यातील 'या' मानाच्या गणपतीचे घेता येणार वर्षभर दर्शन, कोणी घेतला निर्णय वाचा

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, उद्या येऊ घातलेल्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. अशा परिस्थितीत गणेशोत्सव कसा साजरा करायचा याची सर्वांनाच चिंता आहे. तसेच या उत्सवात गणपतीच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात. त्यामुळे या गर्दीवर कसे नियंत्रण मिळवायचे आणि सोशल डिस्टसिंगचे पालन कसे करायचे, असा प्रश्न सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पडला आहे.  

सातारा शहरातील शनिवार पेठेतील मानाच्या समजल्या जाणा-या श्री शंकर-पार्वती गणपती देवस्थानने यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात दहा दिवस असणारा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरविले आहे, तसेच दर्शनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी शासनाने केलेल्या आवाहनानुसार उत्सवामध्ये काही बदल करण्याचेही ठरविले असल्याचे राहुल यशवंत परदेशी यांनी सांगितले.

आम्ही तयार; तुम्ही फक्त लढ म्हणा!

यंदा मुख्य हॉलमध्ये जाऊन भाविकांना मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही, तर लांबूनच एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेऊन भाविकांची दर्शनाची सोय केली आहे. हॉलमध्ये वेळोवेळी सॅनिटायझेशन केले जाणार असून दर्शनास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी सॅनिटायझरची सोय करण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीस दर्शन झाल्यावर दर्शनस्थळी थांबता येणार नाही, तसेच शासनाने केलेल्या आवाहनानुसार मूर्तीला नारळ, पेढे, हार, ओटी व इतर वस्तू वाहण्यास मनाई असल्याने अशा वस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत, याची भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सर्व प्रकारचे भजन, कीर्तन, महाआरती आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. 

कोयनेत पाऊस बरसला; सिंचन, वीजनिर्मितीची चिंताच मिटली

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी यावर्षी मुख्य मूर्ती ऐवजी छोट्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे, तर मुख्य मूर्ती हॉलमध्ये दर्शनासाठी ठेवली जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीवर शासनाने बंदी घातली असल्यामुळे मुख्य मूर्तीचे विसर्जन यंदा केले जाणार नाही. त्याऐवजी लहान पूजेच्या मूर्तीचे शासनाच्या नियमानुसार विसर्जन केले जाईल. तसेच ज्यावेळी मंदिरे दर्शनासाठी खुली केली जातील, त्यावेळी शासनाने दिलेल्या नियमानुसार मुख्य मूर्ती वर्षभर भाविकांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचेही देवस्थानचे प्रमुख परदेशी यांनी सांगितले आहे.

loading image
go to top