सातारा : कोयना धरणाचा विमोचक दरवाजा उघडला; नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

राज्यात सगळीकडे उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात बसत आहेत.
कोयना धरण
कोयना धरणsakal

कोयनानगर : राज्यात सगळीकडे उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात बसत आहेत.अंगाची लाही लाही करणा-या उन्हाचा फटका शेतीला सुध्दा बसु लागला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे पूर्वे कडील शेती करपु नये यासाठी पूर्वेकडील शेतीला संकटमोचक असणाऱ्या कोयना धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी पूर्वे कडून होत असल्याने कोयना धरणाचा आपत्कालीन असणारा विमोचक हा दरवाजा उघडून त्यातून नदीपात्रात २०९८ कुसेस्क् पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. वीज कर्मचारी यांनी पुकारलेल्या संपामुळे धरणातून वीजनिर्मिती न करता धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.

सध्या राज्यात सगळीकडे उन्हाच्या झळा बसत आहेत. वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेचा फटका पूर्वेकडील शेती ला मोठ्या प्रमाणात बसत असल्याने पाण्या अभावी कोरडे पडत चालेल्या शेतीला कोयना धरणातून पाणी देण्यात यावे अशी मागणी सांगली पाटबंधारे विभागाने केल्यामुळे कोयना धरणाचा आपत्कालीन असणारा विमोचक हा दरवाजा सोमवारी २८ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता उघडुन त्यातून नदीपात्रात २०९८ कुसेस्क पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.कोयना धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा आहे. धरणाची जलपातळी २१२१.३ फूट असुन धरणात ६२.३३ टीएमसी पाणीसाठा आहे.

खाजगीकरण व कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ वीज कर्मचारी संपावर गेल्यामुळे पायथा वीज गृहातून केली जाणारी वीजनिर्मिती बंद पडल्याने पायथा वीज बंद करुन धरणाचा आपत्कालीन असणारा विमोचक हा दरवाजा उघडून धरणातून नदीपात्रात २०९८ कुसेस्क पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. वीजनिर्मिती न करता हे पाणी थेट शेती सिंचनाला देण्यात येत आहे.

वीज कर्मचारी वर्गाने पुकारलेल्या संपातून दोन कर्मचारी संघटनेने या संपातून माघार घेतल्याने या संघटनेचे कर्मचारी कामावर हजर राहिल्याने कर्मचारी संपात उभी फूट पडली आहे. यामुळे कोयना जलविद्युत प्रकल्पातील कर्मचारी संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला नाही. कोयना जलविद्युत प्रकल्पातून ५० % वीजनिर्मीती होत असल्याचे महानिर्मिती कंपनीचे तथा कोयना जलविद्युत केंद्राचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com