मोबाईलला नेटवर्क द्या अन्यथा टॉवर काढून न्या, ग्रामपंचायतीने कळविले कंपनीला

Satara
Satara
Updated on

ढेबेवाडी (जि. सातारा) : "थ्रीजी, फोरजीचे नेटवर्क मिळत नसल्यामुळे ग्राहकांचे व विशेषतः ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने "नेटवर्क द्या अन्यथा टॉवर काढून न्या,' असे बनपुरी (ता. पाटण) येथील ग्रामपंचायतीने संबंधित मोबाईल कंपनीला कळविले आहे. 

बनपुरीत संबंधित मोबाईल कंपनीचा टॉवर असला, तरी नेटवर्क मिळत नसल्याने "असून अडचण आणि नसून खोळंबा' अशी त्याची गत झाली आहे. थ्रीजी, फोरजीचे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांचे व विशेषतः ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मोबाईल धारकांना रेंज मिळवण्यासाठी झाडांचा किंवा घरांच्या छतावर जावे लागत आहे. सध्या कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास सुरू आहे. काही पालकांनी तर कर्ज व उसनवारी करून मुलांना शाळेच्या अभ्यासासाठी मोबाईल खरेदी करून दिले असून, तीन- तीन महिन्यांची रिचार्जही मारली आहेत.

मोबाईलचे नेटवर्क मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत उपसरपंच डॉ. शिवाजीराव पवार म्हणाले, ""बनपूर परिसरात संबंधित कंपनीचे मोठ्या संख्येने ग्राहक आहेत. चार महिन्यांपासून संबंधित यंत्रणेकडे नेटवर्कबाबत विचारणा करत असलो, तरी दखल घेतलेली नाही. आता पत्राद्वारे शेवटचा निर्वणीचा इशारा दिला असून, एकतर ग्राहकांना चांगली सेवा द्या नाहीतर तुमचा टॉवर बनपुरी गावातून काढून न्या, असे कंपनीला कळवले आहे.'' 

दरम्यान, अपेक्षित नेटवर्क मिळत नसल्यामुळे ग्राहकांनी तीन- तीन महिने आगाऊ मारलेले रिचार्ज वाया जात आहे. विद्यार्थी व नोकरदारांचे हाल सुरू आहेत. याप्रश्नी आम्ही आंदोलनाद्वारे टॉवर बंद पाडण्याचाही इशारा संबंधितांना दिला आहे, असे बनपुरीचे उपसरपंच डॉ. शिवाजीराव पवार 
यांनी सांगितले. 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmer Loss Assessment
Eknath Shinde Announces Crop Damage Panchanamas From October 5
Kas Plateau Flowers 2026
Clash Between Ruling and Opposition Factions at Sahyadri Sugar Factory AGM
Marathi News Esakal
www.esakal.com