गुड न्यूज...कऱ्हाडमध्ये घरच्या घरी 45 कोरोनारुग्णांवर उपचार!

Satara
Satara

कऱ्हाड (जि. सातारा) : कोविड हॉस्पिटलमध्ये बेड नाहीत, ही वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती आहे. त्यावर पर्याय म्हणून होम आयसोलेशनची सुविधा कऱ्हाड पालिकेने अत्यंत प्रभावीपणे राबवली आहे. त्यातून घरच्या घरी अत्यंत प्रभावी उपाचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. शहरात तब्बल 45 कोरोनाबाधितांना पालिकेने होम आयसोलेट करून त्यांच्यावर डॉक्‍टरांच्या पथकाव्दारे उपचार सुरू केले आहेत. 

पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या पुढाकाराने होम आयसोलेशन येथे प्रभावीपणे राबविले गेले आहे. शहरातील वेगवेगळ्या पेठांत वेगवेगळ्या घरांत रुग्ण आयसोलेट केल्याने कोरोनाचीही भीती कमी होण्यास हातभार लागतो आहे. सातारा जिल्ह्यात वाढणारा कोरोनाचा कहर लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी होम आयसोलेशनची सुविधा राबवावी, असे आवाहन केले. त्यासाठी जिल्ह्यात सर्वांत पहिल्यांदा कऱ्हाड पालिकेने पुढाकार घेतला. मुख्याधिकारी डाके यांनी प्रत्यक्षात त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी डॉक्‍टरांसह एक स्वतंत्र पथक त्यासाठी नेमले. डॉ. अनुजा धोपटे प्रथकप्रमुख आहेत. नागरी आरोग्य केंद्राच्या डॉ. शीतल कुलकर्णी यांचाही सल्ला घेऊन त्यासाठी स्वतंत्र पथक नेमले आहे.

कोरोनाबाधितांचे घर मोठे आहे, त्या घरात स्वतंत्र टॉयलेट आहे, बाथरूमची स्वतंत्र व्यवस्था आहे, त्या घरातील प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र राहू शकते, अशा घरांत होम आयसोलेशनची व्यवस्था केली आहे. होम आयसोलेशन मंजुरीपूर्वी मुख्याधिकारी डाके, त्यांचे पथक घरी भेट देत आहे. पाहणीनंतर त्या कोरोनाबाधितांना होम आयसोलेशनची परवानगी दिली जात आहे. शहरात अशा 45 कोरोनाबाधितांना होम आयसोलेट केले आहे. जे कोरोनाबाधित हायरिस्कमध्ये नाहीत, सीमटर्म कमी आहेत, त्यांना होम आयसोलेट केले जात आहे. शहरातील शुक्रवार, शनिवार, मंगळवार, रविवार पेठेसह, उपनगरांतील काही रुग्णांना होम आयसोलेट केले आहे. त्या रुग्णांची दररोजची तपासणी केली जात आहे. त्यांची ऑक्‍सिजन लेवल, सीमटर्मची स्थिती, अन्य आजार बळावू नयेत, यासाठी औषधोपचार केले जात आहेत. त्या रुग्णांना दिवसभरात किमान दोन वेळा मोबाईलवरून कॉल करून कौन्सिलिंगही केले जात आहे. त्यांची सकारत्मकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

असे आहे होम आयसोलेशन... 

होम आयसोलेट झालेल्या रुग्णांची डॉक्‍टरांकडून होतेय दररोज आरोग्य तपासणी. सीमटर्म, ऑक्‍सिजन लेवल तपासली जात आहे. रुग्णांचे ऑक्‍सिमीटरव्दारे प्लस तपासून नोंद ठेवली जात आहे. अन्य आजार बळावू नयेत, यासाठी औषधोपचारही केले जात आहेत. 
गरज भासल्यास कर्मचाऱ्यांकडून औषधेही पोच केली जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांचीही घेतली जातेय विशेष काळजी. किमान तीन वेळा कोरोनाबाधितांचे होतेय मोबाईल कॉलवरून कौन्सिलिंग 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com