Satara Gram Panchayat Election 2026
esakal
सातारा : जिल्ह्यातील तब्बल १०१३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून विविध तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे रखडलेल्या आहेत. या सर्व ग्रामपंचायतींचा कारभार सध्या प्रशासकांच्या माध्यमातून सुरू (Satara village panchayat election 2026) आहे. दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेली ‘एसआयआर’ची प्रक्रिया येत्या डिसेंबरपर्यंत चालणार असल्याने, ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे शक्य होणार नाही.