Satara : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत पेच निर्माण झाला

मतदार यादीत ग्रामपंचायतींतील जुन्यांच्या नावांमुळे नवे सदस्य मुकणार
सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीची
सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीची sakal

सातारा : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत पेच निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातून दिलेल्या चार उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार जुन्या सदस्यांना, की नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना? याबाबत वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हा तिढा सोडविण्यासाठी जुन्या काही सदस्यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार? यावर २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सध्या विविध कारणांमुळे निवडणुका पुढे जाण्याचे व स्थगित होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. त्याचा परिणाम म्हणून सहकारी संस्थांच्या निवडणुकांना २० डिसेंबरपर्यंत स्थगिती मिळाली आहे; पण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. बाजार समितीच्या निवडणुकांवर आमदार, खासदार गटांचे वर्चस्व राहते. या वेळीही आमदार, खासदारांच्या स्थानिक गटांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. बाजार समितींची अंतिम मतदार यादी तयार आहे.

२३ डिसेंबरपासून निवडणूक कार्यक्रम चालू होणार होता; पण ग्रामपंचायत मतदारसंघातून निवडून देणाऱ्या उमेदवारांना मतदान कोण करणार? ग्रामपंचायतीचे नवे की जुने सदस्य? हा वाद निर्माण झाला आहे. सध्या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. येत्या १८ तारखेला ग्रामपंचायतीसाठी मतदान होऊन २० तारखेला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे नवे सदस्य ग्रामपंचायतीत सत्ताधारी होतील. बाजार समितीसाठी मतदार यादी करताना जुन्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे आली आहेत.

त्यामुळे मतदान कोण करणार? जुने की नवे सदस्य? हा वाद सध्या निर्माण होणार आहे. यासंदर्भात काही जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचे सदस्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणुकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे न्यायालय या निवडणुकीला स्थगिती देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रामपंचायतींच्या नवीन सदस्यांना मतदार यादीत समाविष्ट करूनच मतदान घेण्याबाबत निर्णय देण्याची शक्यताही जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.

सदस्यांच्या हाती चार संचालकांचे भवितव्य...

सातारा तालुका बाजार समितीत ३९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींचे सदस्य हे मतदार असणार आहेत. हे मतदार ग्रामपंचायत मतदारसंघातून निवडून येणाऱ्या चार संचालकांना मतदान करतील. या चार संचालकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून दोन आर्थिक दुर्बल एक व अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गातून एक उमेदवार असतो. त्यामुळे चार संचालकांचे भवितव्य ग्रामपंचायत सदस्यांच्या हातात असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com