थांबा... पुढे धोका आहे... शिखर शिंगणापूरला गुप्तलिंग रस्ता खचला

धनंजय कावडे 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

चैत्र- श्रावण अधिक महिन्यामध्ये गुप्तलिंगाच्या दर्शनासाठी भाविक येथे गर्दी करतात. यावर्षी पाऊस चांगला झालेला असून, गुप्तलिंग डोंगरावरून धबधबे कोसळत आहेत. हे निसर्गरम्य दुष्य पाहण्यासाठी कोरोनातही काही पर्यटक येत आहेत. 

शिखर शिंगणापूर (जि. सातारा) : श्री क्षेत्र गुप्तलिंग मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याकडेची संरक्षक भिंत कोसळ्याने पायरी रस्ता खोल दरीच्या बाजूने खचून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तांकडून होत आहे. 
शिंगणापूरपासून एक किलोमीटर अंतरावर सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत डोंगरदरीत श्री शंकर गुप्त झाले अशी पूर्वापार आख्यायिका सांगितली जात असलेले तीर्थक्षेत्र म्हणून हे गुप्तलिंग प्रसिद्ध आहे. चैत्र- श्रावण अधिक महिन्यामध्ये गुप्तलिंगाच्या दर्शनासाठी भाविक येथे गर्दी करतात. यावर्षी पाऊस चांगला झालेला असून, गुप्तलिंग डोंगरावरून धबधबे कोसळत आहेत. हे निसर्गरम्य दुष्य पाहण्यासाठी कोरोनातही काही पर्यटक येत आहेत. 

शिखर शिंगणापूर हे शंभू महादेवाचे तीर्थक्षेत्र असून, या ठिकाण असलेल्या शंकर पार्वती मंदिराभोवती गुप्तलिंग (शिंगणापूर), एकलिंग (ठोंबरेवाडी), बेलदेव (मोही), वैलदेव (थदाळे), पाणलिंग (वावरहिरे), खाबलिंग (कोथळे), बाणलिंग (फोडशिरस), उबंरदेव (नातेपुते) अशी गोलाकार अष्टलिंग आहेत. श्रावण महिन्यातील गोकुळ अष्टमीला एका दिवसात गिरी (प्रदक्षिणा) घालून शेवट गुप्तलिंगात करण्याची प्रथा आजही जोपासली आहे. अशा पवित्र तीर्थक्षेत्राकडे जाताना सुरक्षित असा रस्ता नसल्यामुळे समस्त भक्तजनांतून तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर 
रस्ता पायरी दुरुस्त करण्याची आग्रही मागणी होत आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

कोरेगावातील प्रथमेशच्या मुकुंद मिश्राने बनवलं लाखाे नेटकऱ्यांना भावुक

सातारा जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल 97.25 टक्के इतका लागला आहे. प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेली यशाेगाथा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Guptaling Road Is Blocked At Shikhar Shinganapur