esakal | पावणेदोन लाखांचा गुटखा जप्त; एक ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

lonand

Satara : पावणेदोन लाखांचा गुटखा जप्त; एक ताब्यात

sakal_logo
By
रमेश धायगुडे, लोणंद.

लोणंद : येथे अवैधरीत्या गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी लोणंद पोलिस व अन्न औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात सुमारे एक लाख ८६ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला असून, या प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.

याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून दिलेली माहिती अशी, लोणंद येथील गोटेमाळ परिसरात एका ठिकाणी अवैधरीत्या गुटख्याचा साठा केल्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी याबाबतची महिती पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांना दिली. सातारा येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना बोलावून घेत जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच लोणंद पोलिस ठाण्याच्या टीमने दोन पंचांसह छापा टाकून ही कारवाई केली. बंदी असलेले विमल, आरएमडी व हिरा कंपनीचे एक लाख ८६ हजार रुपये किमतीचे गुटखा जप्त करून या प्रकरणी सागर नाथाजी शिंदे (रा. लोणंद, ता. खंडाळा) यास ताब्यात घेतले.

या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, महिला पोलिस उपनिरीक्षक स्वाती पवार, पोलिस हवालदार अविनाश नलवडे, विठ्ठल काळे, महेश सपकाळ, सागर धेंडे, अभिजित घनवट, सिद्धेश्वर वाघमोडे, विजय शिंदे, श्री. गार्डी, तसेच अन्न व सातारा औषध प्रशासन विभागाचे ए. ए. पवार, अन्न सुरक्षा अधिकारी आर. आर. शहा, ए. एस. हवालदार यांनी सहभाग घेतला. पोलिस उपनिरीक्षक स्वाती पवार अधिक तपास करत आहेत.

loading image
go to top