दुकानाची भिंत फोडून 60 तोळे दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

फलटणमधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. या हातसफाईत तब्बल 60 तोळे दागिने चोरीस गेले आहेत. चोरी करणारे चोरटे हे सीसीटिव्हीत कैद झाले असले तरी अद्यापपर्यंत तरी त्यांचा सुगावा लागलेला नाही. 

फलटण शहर ः फलटण शहरातील मध्यवर्ती भागातील ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून 60 तोळे दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली. हे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे दोन ते चारच्या दरम्यान हिराचंद कांतीलाल ज्वेलर्स या दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. या दुकानामध्ये काउंटरवर डिस्प्लेसाठी ठेवलेले सुमारे 60 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी नेले. हे चोरटे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. या दुकानातील चांदीच्या दागिन्यांकडे चोरट्यांनी दुर्लक्ष केले आहे. तसेच तिजोरीलाही हात लावलेला नाही. या चोरीची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. नेमका किती ऐवज चोरीस गेला, या अनुषंगाने सोन्याच्या दागिन्यांची तपासणी चालू होती. 

दरम्यान, दुकान बंद केल्यानंतर सराफ दुकानदारांनी दागिने तिजोरीमध्ये ठेवणे आवश्‍यक आहे. दुकानदारांनी सामुहिक रखवालदार ठेवणे आवश्‍यक आहे. या परिसरात पाच ते सहा दुकाने आहेत. परंतु, रखवालदार नाही. सायरन व इतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्‍यक असलेल्या यंत्रणा बसविणे आवश्‍यक आहे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

 

साताऱ्यातील तीन हॉटेल मालकांवर गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara He broke down the wall of the shop and lit 60 lamps