सातारा : कोरोनासाठी ‘आरोग्य’ अलर्ट

पाऊस, वारीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा ॲक्टिव्ह; जिल्हा रुग्णालयासह कऱ्हाडला बेडची व्यवस्था
Satara Covid Updates
Satara Covid Updatessakal
Updated on

सातारा : राज्यातील काही शहरांत वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच आगामी काळात जिल्ह्यातून जाणारी वारी या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गावरील उपचाराची अतिदक्षता विभागासह अन्य यंत्रणा जिल्हा रुग्णालय व कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा ॲक्‍टिव्ह केली जात आहे. (Satara Covid Updates)

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील हजारो नागरिक कोरोनाबाधित झाले. शेकडो लोकांना जीव गमवावा लागला. या परिस्‍थितीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक अलर्ट व सक्षम करण्यात आली होती. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रांबरोबरच अन्य ठिकाणीही रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कोरोनाबाधितांवर योग्य उपचार तसेच अनेकांचा जीव वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. सहा महिन्यांपासून राज्याबरोबरच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास सुरवात झाली.

त्यामुळे हळूहळू सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले. त्याचबरोबर उपचारासाठी निर्माण करण्यात आलेल्या सुविधाही बंद करण्यात आल्या. जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेले जिल्हा कोविड रुग्णालयही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना संसर्गासाठी जिल्हा रुग्णालयांमध्ये तीन अतिदक्षता विभाग तसेच बहुतांश वॉर्ड खुले करण्यात आले होते. कोरोनाची लाट ओसरल्यावर अतिदक्षता विभागाबरोबरच अन्य वॉर्डही पूर्वीप्रमाणे इतर आजाराच्या रुग्णांसाठी सुरू करण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाधितांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई व पुण्याचा सहभाग आहे. जिल्ह्यातही शून्यावर आलेली कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे. सध्या दररोज तीन ते पाच रुग्ण कोरोनाबाधित आढळत आहेत. चार दिवसांपूर्वी हा आकडा १४ पर्यंत गेला होता. त्याचबरोबर बाधितांमध्ये जिल्ह्यातील विविध भागातील व्यक्ती असल्याने संसर्ग सर्वत्र पसरण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यातच पावसाळा सुरू होत आहे. सध्या पाऊस पडत नसला तरी, येत्या काही दिवसांत त्याला सुरवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यातील आजार डोके वर काढणार, हे निश्चित. याचबरोबर जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाणार आहे. तेथे जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यांतील

लोकांची मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी होत असते.

या दोन्हीही परिस्‍थिती कोरोना संसर्गाच्या वाढीसाठी पूरक आहेत. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी उपचाराच्या दृष्टीने पूर्व तयारी सुरू केली आहे. कोरोना संपल्यामुळे बंद करण्यात आलेला जिल्हा रुग्णालयातील एक जनरल वॉर्ड पुन्हा कोरोनासाठी राखीव करण्यात आला आहे. त्याचबरोबर १४ बेडचा एक अतिदक्षता विभाग तसेच एक लहान मुलांचा अतिदक्षता विभागही कोरोनासाठी ठेवला आहे. जिल्हा रुग्णालयाबरोबरच कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयातही कोरोना संसर्गाच्या उपचारासाठी सात बेडचा एक अतिदक्षता विभाग तयार ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated
Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara
Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
UNESCO Kas Plateau flower blooming season
Marathi News Esakal
www.esakal.com