Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी 'कोयना' 33 टक्क्यांहून अधिक भरली! साताऱ्यातील इतर धरणांमध्ये किती पाणी? वाचा एका क्लिकवर...

How much rain did Satara receive today? सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा 35.71 टीएमसीवर पोहोचला आहे. अनेक भागांत अतिवृष्टी झाली आहे.
Koyna Dam storage report today

Koyna Dam storage report today

esakal

Updated on: 

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदी, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणात (Koyna Dam water level today) मंगळवारी (ता. 7) सकाळी 10 वाजेपर्यंत 35.71 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 33.93 टक्के भरले आहे. धरणात 93 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील (District Collector Santosh Patil) यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com