esakal | वारांगनांना अन्य व्यवसायासाठी मदतीचा हात, कोरोनात संसर्ग टाळण्यासाठी योजना
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

वारांगनांच्या सबलीकरणासह त्यांना अन्य व्यवसायाकडे वळविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. लॉकडाउनसह कोरोनामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही स्थिती लक्षात घेऊन पालिकेने हा निर्णय घेतला आहे. 

वारांगनांना अन्य व्यवसायासाठी मदतीचा हात, कोरोनात संसर्ग टाळण्यासाठी योजना

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनासारख्या महामारीत सामूहिक संसर्ग टाळला जावा, यासाठी वारांगनांसाठी महत्त्वाकांक्षी योजना पालिकेने हाती घेतली आहे. वारांगनांना त्यांच्या मूळ व्यवसायापासून परावृत्त करून त्यांना अन्य व्यवसायातून स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. 

वारांगनांसाठी कर्जसुविधांसह अन्य सर्व व्यवस्था पालिकेतर्फे करणार आहे. कऱ्हाड पालिका जिल्ह्यात पहिल्यांदाच असा प्रयोग राबविणार आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी वारांगनांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी कल्पकता लढवली आहे. वारांगनांच्या सबलीकरणासह त्यांना अन्य व्यवसायाकडे वळविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. लॉकडाउनसह कोरोनामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही स्थिती लक्षात घेऊन पालिकेने हा निर्णय घेतला आहे. स्थानिकसह बाहेरून आलेल्या तब्बल 300 वारांगनांची संख्या शहरात आहे. त्यातील काही महिला लॉकडाउनमुळे त्यांच्या कर्नाटकात स्थलांतरित झाल्या आहेत. येथे आहेत, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी अन्य व्यवसाय एक संधी असणार आहे, असे गृहित धरून पालिकेने त्यांच्यासाठी अन्य व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे. वारांगनांच्या व्यवसायातून होणारे कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल म्हणूनही पालिकेच्या उपक्रमाचा उल्लेख होत आहे. 


""पालिकेने वारांगनांना त्यांच्या व्यवसायापासून परावृत्त व्हावे, यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यास त्यांचा बचत गट तयार करून त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासह व्यवसायाची सुरवात करून देण्यापर्यंतची मदत पालिका करणार आहे.'' 

-रमाकांत डाके, 
मुख्याधिकारी, कऱ्हाड 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

loading image
go to top