esakal | कऱ्हाडला पोर्टेबल व्हेंटिलेटरद्वारे दोघांना जीवदान, पालिकेकडून घरपोच ऑक्‍सिजन
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

शहरातील कृष्णा, शारदा व सह्याद्री अशी तीन कोविड हॉस्पिटल हाउसफुल्ल आहेत. नव्याने सुरू केलेले श्री हॉस्पिटलही कोविड रुग्णांनी फुल्ल होत आले आहे. जैन समाजाने पुढाकार घेऊन उभा केलेल्या कोविड सेंटरमध्ये "सह्याद्री'मधील रुग्णांना नेले जात आहे. व्हेंटिलेटरच नसल्याने अनेक रुग्णांना हालपेष्टा सहन करावी लागत आहे.

कऱ्हाडला पोर्टेबल व्हेंटिलेटरद्वारे दोघांना जीवदान, पालिकेकडून घरपोच ऑक्‍सिजन

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : बेड, व्हेंटिलेटरची उपलब्धता नसल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांना घेऊन दवाखान्यांच्या दारोदार फिरण्याची वेळ नातेवाईकांवर येते आहे. त्यावर पर्याय म्हणून पालिकेने ज्यांना गरज आहे, त्यांना घरपोच ऑक्‍सिजनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दोन दिवसांत दोघांना ऑक्‍सिजन पुरवल्याने त्यांना पालिकेमुळे जीवदान मिळाले आहे. काही नागरिकांनी पालिकेस पोर्टेबल व्हेंटिलेटर दिले आहे. त्याद्वारे पालिकेने घरपोच ऑक्‍सिजनची सुविधा दिली आहे. 

शहरातील कृष्णा, शारदा व सह्याद्री अशी तीन कोविड हॉस्पिटल हाउसफुल्ल आहेत. नव्याने सुरू केलेले श्री हॉस्पिटलही कोविड रुग्णांनी फुल्ल होत आले आहे. जैन समाजाने पुढाकार घेऊन उभा केलेल्या कोविड सेंटरमध्ये "सह्याद्री'मधील रुग्णांना नेले जात आहे. पार्ले येथेही कोविड रुग्ण असल्याने तेथेही जागा नाही, अशी स्थिती आहे. व्हेंटिलेटरच नसल्याने अनेक रुग्णांना हालपेष्टा सहन करावी लागत आहे. शहरातील दाट लोकवस्तीमुळे सामाजिक संसर्ग होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यावर पर्याय शोधण्यासाठी शासनाकडे मागणी होत आहे.

सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील विविध भागांसह थेट मुंबईहून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे कऱ्हाड शहरातील कोविड हॉस्पिटल हाउसफुल्ल आहेत. कोविड हॉस्पिटलमधील एकही बेड शिल्लक नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांवर हॉस्पिटल शोधत फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळेही संसर्गाचा धोका वाढलेला आहे. त्यावर पालिकेने उपाय शोधला आहे. ज्याला गरज आहे. त्याला घरपोच ऑक्‍सिजन दिला जात आहे. पालिकेला शहरातील समविचारी सामाजिक संस्थेने पार्टेबल व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिला आहे. त्याद्वारे पालिकेने घरपोच ऑक्‍सिजनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

आतापर्यंत त्याद्वारे पालिकेने दोघांना जीवदानही दिले आहे. त्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी पुढाकार घेतला आहे. परवा रात्री त्यांनी स्वतः दम लागलेल्या रुग्णाला पीपीई किट घालून पालिकेला उपलब्ध झालेल्या पोर्टेबल व्हेंटिलेटरद्वारे ऑक्‍सिजन देऊन जीवदान दिले आहे. रात्री ऑक्‍सिजनची गरज लागते. ती गोष्ट लक्षात घेऊन ज्यांना गरज आहे, त्या रुग्णांना घरपोच ऑक्‍सिजनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गणेशोत्सवात मोठ्या गणेश मंडळांनी असे पोर्टेबल व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांचे जीव वाचविण्यात पालिकेला यश येईल. त्यामुळे गणेश मंडळांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिकेसह मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

loading image
go to top