सातारा : महाबळेश्वरात हनीट्रॅप प्रकरण उघडकीस; पुण्यातील महिलेचा समावेश

पुण्यातील एका महिलेने महाबळेश्वर येथील एका इसमास फेसबुक वरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.
honeytrap
honeytrapsakla

महाबळेश्वर : मागील आठवडयात महाबळेश्वर शहरात उघडकिस आलेल्या हनीट्रॅप प्रकरण पोलिसांनी हाताळताना योग्य ती काळजी न घेतल्याने या प्रकरणातील येथील एका प्रतिष्ठित व्यक्तीस काही लाखाला लुटण्यात पुण्यातील एक महीला यशस्वी झाली. या काही लाखात कोण कोण सहभागी होते याची शहरात आता जोरदार चर्चा सुरू आहे.

पुण्यातील एका महिलेने महाबळेश्वर येथील एका इसमास फेसबुक वरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. इसमाने प्रथम दुर्लक्ष केले तेव्हा महिलेने पुुन्हा रीक्वेस्ट पाठविली या वेळी इसमाने ती रिक्वेस्ट स्विकारली आणि मग त्यांच्यात चॅटींग सुरू झाले. काही दिवसांच्या चॅटींग नंतर त्यांची पुण्यात एका रेस्टाॅरंट मध्ये भेट झाली, ओळख वाढली व काही दिवसांनी ती महीला थेट महाबळेश्वर येथे आली. तो इसम महाबळेश्वरातील प्रतिष्ठित नागरिक होता. त्याने त्या महीलेची भेट घेवुन एका हाॅटेल मध्ये त्या महिले सोबत चहा घेतला व पुन्हा तो इसम आपल्या ऑफिसात परत आला. थोड्यावेळानंतर त्या महिलेने संबंधित इसमाला वारंवार फोन सुरू केला व तीने " तु माझा विनयभंग केला आहेस व तु माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न केला आहे अशी मी पोलिसात तक्रार करणार आहे, मी पोलिसात जावू नये असे तुला वाटत असेल तर तु मला एका ठिकाणी भेट नाहीतर परीणाम गंभिर होतील असे सांगितले.

महिलेने असा दम देताच महाबळेश्वरातील त्या इसमाची पाचावर धारण बसली त्याने या बाबत आपल्या मित्रां बरोबर चर्चा केली व ती महीला वारंवार फोन करू लागली व धमकी देवु लागली त्यामुळे संबंधित इसम आता पुरता घाबरला होता तरी त्याने महीलेची भेट घेण्याचे कबूल करत तिला थेट घरीच बोलावले व घरात घडलेली सत्य घटना सांगून टाकली. घरी जावुन त्या महीलेले इसमाच्या पत्नीची व मुलाची भेट घेवुन तीने तेथेही तीच धमकी दिली. तो इसम म्हणाला मी तुम्हाला काही केले नाही उगीचच माझेवर आरोप का करता परंतु त्या महीलेले पुन्हा पोलीसांत जाण्याची धमकी दिली. ती महीला पोलिसात गेली परंतु तीने कोणतीही तक्रार दिली नाही. दरम्यान मित्रांबरोबर चर्चा झाल्यानंतर व तिला घरी बोलावण्या अगोदर त्या इसमाने संभाव्य धोका ओळखुन पोलिस निरीक्षक यांचे बरोबर फोनवर चर्चा करुन त्यांच्या सांगण्यावरून महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला. पोलिसांनी या तक्रारीला गांभिर्याने घेतले नाही व ती तक्रार त्या दिवशी दाखलच केली नाही आणि चौकशीही केली नाही.

दुसरे दिवशी पुन्हा सकाळ पासुन त्या महीलेने महाबळेश्वरातील त्या इसमाला फोन करून धमकी देण्यास सुरूवात केली. यावेळी तिने वाई येथील एका संघटनेचे काही पदाधिकारी सोबत आणले होते. तेव्हा इसमाचे काही मित्र त्या महीलेला भेटले. या भेटीत त्या महीलेने तक्रार नको असेल तर मला पैसे हवे आहेत असे सांगितले तेव्हा थोडी रक्कम महीलेला देण्याची इसमाच्या मित्रांनी तयारी दाखविली. तेव्हा त्या महीलेने मोठया रक्कमेची मागणी केली आणि बैठक फिसकटली. पुन्हा महीलेचे फोन सुरू झाले. इसम काही प्रतिसाद देत नाही हे पाहुन ती महीला प्रथम वाई येथील एका संघटनेचे प्रतिनिधी घेऊन थेट पोलिस ठाण्यात गेली व तेथे तक्रार दिली. परंतू तक्रार दाखल करण्याबाबत तिनेच पोलिसांकडे थांबण्यासाठी सांगितले होते. पोलिसांकडे आता दोन्ही बाजुच्या तक्रारी होत्या.

महीलेने त्या इसमा सोबत काढलेला सेल्फी पोलिसांना दाखविला तर इसमाने ती महिला धमकी देत असल्याचे व पैशाची मागणी करीत असल्याचे फोन रेकाॅर्ड वाजवुन दाखविले. मात्र, पोलिसांनी कोणतीच तक्रार दाखल केली नाही. तर, हे प्रकरण मिटविण्यासाठी वाईतील एका राजकीय पक्षाच्या व्यक्तीला पाचारण केले. सायंकाळी तो पुढारी आला त्याने पोलिस निरीक्षक, महीला, इसमाचे मित्र यांचे बरोबर वेगवेगळया बैठका घेतल्या. महीलेच्या तक्रारीला जामिन मिळणार नाही, सहा महीने आत रहावे लागेल असे त्या इसमाला सांगण्यात आले. महिला सातत्याने फोन करून धमकी देत होती, पैशाची मागणी करीत होती हे पुरावे असताना ही तो इसम व त्याचे कुटूंब घाबरले आणि ती महीला मागणी करीत असलेली रक्कम देण्यास तो इसम अखेर तयार झाला. मग कोणाला किती याची यादी तयार करण्यात आली आणि हे प्रकरण मिटविण्यात आले.

पत्रकारांनी या प्रकरणाची खबर मिळाली त्यांनी संबंधित इसमाची भेट घेवुन सर्व हकीकत ऐकली. या प्रकरणातील महीलेचेही पत्रकारांनी भेट घेतली व तिची बाजुही ऐकली नंतर या प्रकरणाच्या तडजोडीच्या बैठका झाल्या त्या बैठकावर देखिल पत्रकार बारीक नजर ठेवुन होते. हे प्रकरण चालु होते तेव्हा पत्रकारांनी पोलिस निरीक्षक यांची भेट घेवुन हे प्रकरण गांभिर्याने हाताळा ब्लॅकमेल करणारी महीले पासुन काहीही दोष नसलेल्या इसमास संरक्षण दया अशी मागणी केली. महीलेने इसमाच्या मध्यस्थांकडे केेलेल्या पैशाच्या मागणीचे रेकाॅर्डींग उपलब्ध असताना पोलिसांनी या पुराव्यांकडे दुर्लक्ष करून महीलेला ब्लॅकमेलिंग करण्यास मदत केली असा आरोप आता शहरातुन होत आहे.

या संदर्भात काही नागरीकांनी जिल्हा पोलिस अधिक्षक यांची भेट घेवुन या प्रकरणाची माहीती दिली व प्रकरणाची निपक्ष चौकशी करण्याची मागणी केली परंतु जिल्हा पोलिस अधिक्षकांनी देखिल हे प्रकरण गांभिर्याने घेतले नाही. संबंधित इसमा विरोधात माझी काही तक्रार नाही व मी पुन्हा कोणत्याही प्रकारे या इसमाला त्रास देणार नाही व कोणत्याही पोलिस ठाण्यात तक्रार करणार नाही असे पोलिसांनी महीले कडुन लेखी घेतले व त्या इसमा कडुन या प्रकरणात माझी काही तक्रार नाही असे लेखी घेवुन पोलिसांनी हे प्रकरण बंद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com