esakal | या बागायती भागाला हिरवाईचे बाळसे
sakal

बोलून बातमी शोधा

jawali

कुडाळ भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पीक घेतले जाते. भरपूर पाऊस झाल्याने या भागातील डोंगर हिरवेगार झालेत. हिरवळीची चादर सर्वत्र तयार झाल्याने भकास असणारा हा परिसर आता मनमोहक झाला आहे. या भागातील फळबागाही बहरल्या आहेत. 

या बागायती भागाला हिरवाईचे बाळसे

sakal_logo
By
महेश बारटक्के

कुडाळ (जि. सातारा) ः जावळी तालुक्‍यातील कुडाळजवळील बागायती भागात यंदाच्या वर्षीही पावसाने भरपूर साथ दिली आणि माळरानातील शेतातीलही पिके जोमाने डोलू लागली आहेत. खरिपाच्या पिकांतून खिसा गरम होण्याच्या आशेने बळिराजा आनंदाने सुखावला आहे. 

कुडाळ विभाग पाटपाणी असल्याने नेहमी हिरवागार असतो. मात्र, डोंगराकडील काही गावांत अद्याप कॅनॉलचे पाणी पोचले नसल्याने नेहमी भकास असणारा भागही यंदाच्या वर्षी या भागात वेळेवर मॉन्सूनच्या पावसाने हजेरी लावली असल्याने हिरवागार झाला आहे. नंतरही तीन-चार वेळा मोठे पाऊस झाले. सध्या या भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पीक आहे. भरपूर पाऊस झाल्याने या भागातील डोंगर हिरवेगार झालेत. हिरवळीची चादर सर्वत्र तयार झाल्याने भकास असणारा हा परिसर आता मनमोहक झाला आहे. या भागातील फळबागाही बहरल्या आहेत. दमदार पावसाने भागाभागातील ओढे-नाले वाहते झाले आहेत. विहिरी व गावतळीही भरली आहेत. लॉकडाउनमुळे पर्यटनाच्या सर्व वाटा बंद असल्याने हिरवेगार डोंगर व परिसर पाहण्यासाठी परिसरातील निसर्गप्रेमी रानामळात फिरताना दिसत आहेत. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

बाप्पांच्या जयघाेषात साताऱ्यात एसटी सुरु ; अशा आहेत गावांच्या फेऱ्या 

loading image
go to top