esakal | आता जिल्हा कारागृहात Oxygen Bed; कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen Bed

आता जिल्हा कारागृहात Oxygen Bed; कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा निर्णय

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : जिल्हा रुग्णालयातील अन्य कोरोनाबाधित रुग्णांसोबत बाधित कैद्यांवर उपचार करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने जिकिरीचे होत आहे. त्यामुळे जिल्हा कारागृहातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डमध्ये दहा ऑक्‍सिजन बेड तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे बाधित कैद्यांवर आता प्रिझनर वॉर्डमध्येच उपचार होणार असल्याने सुरक्षिततेचा ताण पोलिस दलावर येणार नाही. (Satara Hospital Prisoner Ward Ten Oxygen Bed Facility)

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या संख्या वाढत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील बेडची संख्या वाढविण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहेत. कोरोनाची लाट सुरू असतानाही जिल्ह्यातील गुन्हेही घडत आहेत. त्यामुळे विविध कारणासाठी न्यायलयीन कोठडी मिळालेल्या संशयितांना जिल्हा कारागृहात दाखल करण्यात येते. त्या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या संशयितांकडून अन्य कैद्यांना बाधा होऊ नये, याचीही दक्षता घेतली जात आहे; परंतु तरीही जिल्हा कारागृहातील कैदी कोरोनाबाधित होत आहेत. या अन्य कैद्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता बाधित कैद्यांवर कारागृहामध्येच उपचार होत नाहीत. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले जाते. जिल्हा रुग्णालयामध्ये पूर्वीपासून आजारी पडलेल्या कैद्यांच्या उपचारासाठी स्वतंत्र प्रिझनर वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे.

काेराेनाचा विस्फाेट : बाप रे! केंद्राच्या यादीत महाराष्ट्रातील दाेन जिल्ह्यांचा समावेश

रुग्णालयातील दाखल करून उपचार करण्याची गरज असलेल्या या कैद्यांना या प्रिझनर वॉर्डमध्येच उपचार करण्यात येतात. त्या ठिकाणी 24 तास पोलिसांचा बंदोबस्तही असतो; परंतु बाधित रुग्णांना या वॉर्डमध्ये ठेवले जात नव्हते. त्यांना अन्य बाधित रुग्णांबरोबर जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये उपचारासाठी ठेवले जाते. त्यामुळे प्रिझनर वॉर्डच्या बंदोबस्ताबरोबरच पोलिसांना कोरोना वॉर्डमध्ये दाखल असलेल्या कैद्याच्या बंदोबस्तासाठीही स्वतंत्र पोलिस बंदोबस्त ठेवावा लागत होता. कोरोना वॉर्डच्या बाहेर कैद्याच्या बंदोबस्तासाठी थांबणे बंदोबस्ताला नेमलेल्या पोलिसांसाठीही जिकिरीचे व त्रासदायक होत होते. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर पोलिस कार्यरत आहेत.

या बाधितांच्या जादाच्या बंदोबस्तामुळे अन्य कामालाही पोलिस दल कमी पडत होते. त्यातच मागील आठवड्यामध्ये कोरोना वॉर्डमधून एका कैद्याने पलायन केल्याची घटना घडली. त्यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबितही व्हावे लागले. पोलिसांची कमतरता व कैद्याची सुरक्षितता या दोन्हींचा विचार करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण व पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची चर्चा झाली. त्यानुसार प्रिझनर वॉर्डमध्येचे ऑक्‍सिजनचे दहा बेड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रिझनर वॉर्डमध्ये सेंट्रल ऑक्‍सिजन सिस्टिम बसविण्यास सुरवात झाली आहे. येत्या दोन दिवसांत हा वॉर्ड उपचारासाठी सज्ज होणार आहे.

रेल्वे रूग्णालयात नोकरीची सुवर्ण संधी; ऑनलाईन मुलाखतीव्दारे होणार 'मेडिकल स्टाफ'ची निवड

सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांवर ताण आहे. पोलिसांची कमतरता व कैद्याची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हा कारागृहात प्रिझनर वॉर्डमध्येचे ऑक्‍सिजनचे दहा बेड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

-अजय कुमार बन्सल, पोलिस अधीक्षक, सातारा

Satara Hospital Prisoner Ward Ten Oxygen Bed Facility