जिल्हाधिकारीसाहेब हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी द्या

जिल्हाधिकारीसाहेब हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी द्या

Published on

सातारा  हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सातारा जिल्हा हॉटेल मालक संघाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे. संघाचे अध्यक्ष राजू भोसले, उपाध्यक्ष मोहन पुरोहित, सेक्रेटरी राजू घुले, खजिनदार राजन शहा, महेंद्र चव्हाण आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे, की हॉटेल व्यावसायिकांनी 19 मार्चपासून आपली हॉटेल बंद ठेवली आहेत. राज्य सरकारने घरपोच पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास सूट दिलेली आहे. हॉटेल व्यवसायाची कोविड 19 मुळे सर्वांत जास्त हानी झाली आहे. या स्थितीचा विचार करून 81 दिवस हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूमचे व्यवहार पूर्णतः बंद असल्याने घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबिल, तसेच इतर प्रशासकीय कर भरणे अशक्‍य झाले आहे. तरी या काळातील पाणीपट्टी, वीजबिल व इतर प्रशासकीय कर माफ करावेत. काही उद्योजकांनी कर्ज घेऊन उद्योग सुरू केलेला आहे. बंद काळात व्यवहार पूर्णतः ठप्प असल्याने कर्जाचे हप्ते व व्याज भरणे कठीण झाले आहे. या काळातील कर्जावरील व्याज माफ करावे. ज्या हॉटेल व्यावसायिकांकडे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याबाबत पुरेशा जागेची उपलब्धता आहे. अशा व्यावसायिकांचा तरी व्यवसाय सुरू करण्याबाबत विचार करावा. त्यामुळे हॉटेलवर अवलंबून असलेल्या छोट्या उद्योगांना चालना मिळेल.

हॉटेल कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याने याबाबत प्रशासनाने योग्य विचार करावा. प्रशासनाने घातलेल्या अटी व शर्तींचे यापुढील काळातही आम्ही पालन करू, असेही या निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी भाऊ शिर्के, गणपतराव जाधव, ऋतुराज चव्हाण, संजय निकम, राहुल भोसले, श्री.जाधव, श्री.कबाडिया आदी उपस्थित होते.

काॅंग्रेस एकनिष्ठ आमदार भाजपच्या गोटात ?

रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदासाठी 'ही' नावे चर्चेत; 27 जूनला निवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.