पाेलिसांच्या खिसे भरु प्रवृत्तीमुळे सातारकरांचा जीव टांगणीला; हॉटेल व्‍यवसायाला अच्‍छे दिन...

पाेलिसांच्या खिसे भरु प्रवृत्तीमुळे सातारकरांचा जीव टांगणीला; हॉटेल व्‍यवसायाला अच्‍छे दिन...
Updated on

सातारा : कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल्सना केवळ पार्सल सुविधा पुरविण्यास परवानगी दिली आहे. परंतु, सातारा शहरामध्ये बहुतांश हॉटेलमध्ये आता गिऱ्हाईकांना हाॅटेलच्या आवारात बसून चहापान करुन दिले जात आहे. या साटेलोट्यामध्ये काहींनी आर्थिक उलाढाल सुरू केली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांना हरताळ फासला जात आहे. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. चार टप्प्यांच्या लॉकडाउननंतर पाचव्या टप्प्यात विविध निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी रेस्टॉरंट (भोजनालयांना) पार्सल सुविधा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामध्ये संबंधित हॉटेलचालकाने मोबाईल तसेच ऑनलाइन पद्धतीचा उपयोग करून ऑर्डर बुकिंग करण्याची तसेच संबंधित ग्राहकाला त्याच्या पत्त्यावर अन्न पदार्थ पोचविणे अपेक्षित होते. त्यासाठी संबंधित हॉटेलचालकांना डिलिव्हरीबॉय नेमण्यास व त्यांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्‍यक असलेल्या उपाययोजनांचे पालन करण्याच्या सूचना आहेत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सवलतींचा सर्रास सातारा शहरात गैरफायदा घेण्यास सुरवात झाली आहे.
 
प्रामुख्याने सातारा शहरातील काही हॉटेल्सनी सुरवातीच्या टप्प्यात आपल्या दुकानासमोर पार्सल सुविधेचे फलक तयार करून घेतले. परंतु, केवळ ऑनलाइन ऑर्डर न स्वीकारता दुकानांमध्ये थेट येणाऱ्या ग्राहकांनाही पार्सल देण्यास सुरवात केली. त्यानंतर काही दिवसांतच बाहेर पार्सल सुविधा लावलेला फलक केवळ शोपीस ठरेल, अशा पद्धतीने कामकाज सुरू झाले आहे. ग्राहकांना हॉटेलमध्ये बसायला देऊन सर्व्हिस देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यातही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे कोणत्याही प्रकारे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे ग्राहक जथ्थ्याने हॉटेलमध्ये बसून बिनधास्त आपल्या आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेऊ लागले आहेत. तीच परिस्थिती चहांच्या गाड्यांबाबतही आहे. सर्वच ठिकाणी ग्राहक थांबून पदार्थ घेत असल्याचे चित्र संपूर्ण शहरात दिसत आहे.
 
पार्सल सुविधेबाबतही जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमानुसार सर्व दुकाने व आस्थापनांना नऊ ते पाच या कालावधीतच व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, हा नियमाची पायमल्ली हाेत असल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक ठिकाणी पाचनंतरच काय रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत बिनधास्तपणे पार्सल सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नियमानुसार आपल्या हद्दीत अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. तशा पद्धतीने नियंत्रण ठेवण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, बहुतांश ठिकाणी नियमांची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. उलट अडचणीच्या काळात आलेल्या या निर्बंधांचा आपल्याला कसा लाभ होईल, या विचारात काहीजण गुंतले आहेत. 


मंथली गिऱ्हाईक वाढले? 

मंथलीच्या गिऱ्हाईकांमध्ये वाढ झाल्याची काहींची भावना झाली आहे. त्यामुळे नियम मोडणारे चिरीमिरी देऊन आश्‍वस्त होत आहेत. परंतु, शहरामध्ये वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता ही भूमिका शहरासाठी आत्मघाती ठरू शकते. त्यामुळे नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत पाेलिस अधीक्षक सातपुते यांनी कठोर भूमिका घेणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sowing Season Worry: ‘Certified’ Seeds Allegedly Fail Quality Test
Shovels in Hand, Change in Action: Women’s Collective Effort Wins Praise
Koyna Dam submerged villages history
Farmers Rejoice as Persistent Rain Boosts Water Levels in Koyna Catchment
Marathi News Esakal
www.esakal.com