आगाशिववर गुफा दुर्लक्षित, लेणी की अन्य काही याबाबत उत्सुकता

Satara
Satara
Updated on: 

विंग (जि. सातारा)  : आगाशिव पायथ्यालगत कानोबा दरा व गिधडाचा कडा असे त्याला संबोधल्या जाणाऱ्या परिसरात प्राचीन काळातला नैसर्गिक दगडी ठेवा दुर्लक्षित आहे. त्यास गुफेचा आकार असून, त्याची दुरवस्था झालेली आहे. तेथे जायला कुणी धजवत नाही. परिणामी हा कुतूहलाचा विषय झालेला आहे. 

येथील आगाशिवला ऐतिहासिक वारसा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा ठरत आहे. डोंगरात विखरलेल्या प्राचीन बौद्धकालीन लेण्यांमुळे तो प्रसिद्ध आहे. पर्यटक त्याठिकाणला नेहमी भेट देऊन इतिहास जाणून घेत असतात. इतिहासातला एक भाग म्हणून येथून जवळ पायथ्यालगत नैसर्गिक दगडी 
ठेवा मात्र चर्चेचा विषय ठरतो आहे. तो दुर्लक्षित आहे. दुतर्फा मोठे कडे असून, खोल दरीत उताराला तो आहे.

कानोबा दरा नावाने तो परिसर ओळखला जातो. गिधडाचा कडा असेही त्याला संबोधले जाते. मोठ्या दगडात कोरलेल्या स्थितीत तो आहे. गुफेच्या आकाराचा तो आहे. त्यात माणसाला प्रवेश करता येईल एवढे मोठे छिद्र आहे. त्यास पुढे मार्ग आहे. लगत अर्धचंद्राकार दगड आहे. ते बुजलेले आहे. त्याची दुरवस्था कायम आहे. त्याठिकाणी जाणे-येणे सहज शक्‍य होत नाही. त्यामुळे तिकडे जायला कुणी धजत नाही. खोल दरी अणि झाडाझुडपांमुळे भीती वाटते. त्याबाबत फारसा इतिहास अद्याप कुणाला माहीत नाही. गुपीत जाणून घेण्याचा प्रयत्न कुणी केलेला दिसत नाही. मात्र, पूर्वी लोक त्याठिकाणी जात होते. त्यात दिवा लावत होते. अशी चर्चा जाणकार करतात. तेथे लेणी की अन्य काही आहे याबाबत संभ्रम आहे. दुर्लक्षामुळे प्राचीन ऐतिहासिक ठेवा मात्र दृष्टिआड होण्याच्या मार्गावर आहे. 

प्राचीन कोरीव लेणी हे आगाशिवाचे खास वैशिष्ट आहे. पुरातत्व विभागाकडे एकूण 108 लेण्याची नोंद आहे. त्यातील जखीणवाडी- नांदलापूर बाजूने डोंगर उताराला काही आहेत. कमळभैरी परिसरात आणि आगाशिवनगरच्या बाजूनेही ती आहेत. अद्याप पूर्णपणे ती सापडलेली नाहीत. तो लेण्यातला 
एक भाग असावा. 


""मित्रासमवेत मी त्याठिकाणी गेलो होतो. गुफेचा आकार त्यास आहे. मी आत प्रवेश केला. पुढे त्यास मार्ग आहे. मात्र, आतमध्ये आंधारामुळे भीती वाटते. गुपित जाणून घेण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष देऊन शोध घेण्याची गरज आहे.'' 

- वसंत होगले, पर्यटक 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara District Bank Election Scrutiny Sees Seven Objections Lawyers Argue Over Cooperative Law And Candidate Eligibility
Kisan Veer Sugar Factory Salary Crisis Workers Protest Over Unpaid Wages Anger Grows Against Makarand Patil And Nitin Patil
Pune Bengaluru Highway to Karad City
Satara News 17 Year Old Girl Dies In Family Dispute Over Mobile Phone And Television Father Loses His Temper
Marathi News Esakal
www.esakal.com