Satara: मल्हारपेठ, नवारस्ता परिसरात अवैध धंदे जोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

illegal business

सातारा : मल्हारपेठ, नवारस्ता परिसरात अवैध धंदे जोरात

मल्हारपेठ : मल्हारपेठ- नवारस्ता परिसरात अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. गावोगावी बाटलीबंद दारूविक्रीमुळे गावातील शांतता धोक्यात येऊ लागली आहे. अवैध मटक्याबरोबर विनापरवाना लॉजही फार्मात आले आहेत. नवनियुक्त पोलिस निरीक्षक याबाबत काय भूमिका घेणार याकडे? सर्वांच्या नजरा लागल्या.

कोरोना संचारबंदी शिथिल होताच पाटण तालुक्यातील अवैध व्यवसायांनी डोके वर काढले आहे. संचारबंदीत अनेकांना पुण्या- मुंबईच्या नोकऱ्यांना मुकावे लागल्यामुळे गावोगावी काही तरुण व्यसनांसह अवैध मटक्याच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. मटक्यातून अनेक वेळा वर्चस्ववादातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. यास प्रतिबंध करणारी यंत्रणाच कुचकामी ठरत असल्याने अशा प्रकारचे गुन्हे वाढत आहेत.

हेही वाचा: सातारा : डोंगरातील वाटेवरच बिबट्याचा मुक्काम; शेतकरी चिंतेत

यामुळे अवैध धंद्यांना कोणाचा वरदहस्त आहे हे शोधून काढण्याची गरज आहे. मल्हारपेठ, नवारस्ता, पाटण या तालुक्यातील मोठ्या बाजारपेठा; परंतु याठिकाणी अशा व्यवसायाला बळ मिळते कशामुळे? हाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक अधिकारी आले आणि गेले. बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी कमी दिवसात आपल्या कामाचा ठसा उमटवून गेले. अशा धंद्यांतून मिळणाऱ्या पैशामुळे गुंडगिरी वाढू लागली आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांनीच याची दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.

उत्पादन शुल्कला माहिती असूनही...

निसरे फाट्यावर अवैध बारमालकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निकषाप्रमाणे दारू विकण्यासाठी परवानगी नसतानाही खुले आम विक्री होत आहे. निसरे गावात ग्रामपंचायतीचा दारूबंदीचा ठराव झालेला असताना विक्री कोणामुळे होत आहे? हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. उत्पादन शुल्क खात्याला अशा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांबाबत माहिती असूनही तेथे कारवाई केली जात नाही, अशीही चर्चा आहे.

Web Title: Satara Illegal Business Malharpeth Navrasta

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Satara