
सातारा : सातारा शहराचा होणारा विस्तार लक्षात घेता येथे ई बसच्या धर्तीवर शहर बस वाहतूक (सिटी बस) सेवा सुरू करणार आहोत. या संदर्भात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व सचिव संजय शेट्टी यांच्याशी चर्चा झाली आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.