
भिलार : नाताळची सुटी आणि नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी फुलून गेले आहे. मागील १५ दिवसांपासून महाबळेश्वर, पाचगणीसह परिसरातील हॉटेल, रिसॉर्ट पर्यटकांनी फुलून गेली आहेत. नाताळपासून वाढू लागलेल्या या पर्यटकांच्या संख्येने आता गर्दीचे रूप धारण केले आहे.