कऱ्हाड तालुक्‍यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले पाचपटीने

सचिन शिंदे 
Wednesday, 23 September 2020

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केवळ 672 नागरिक कोरोनामुक्त झाले होते. ती कोरोनामुक्ती कालपर्यंत पाच हजार 215 वर गेलेली आहे. ही आकडेवारी अत्यंत दिलासादायक असून, कोरोनावर योग्य उपचार केल्यास तो बरा होतो, हेच यातून सिद्ध होत आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कऱ्हाड तालुक्‍यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी कोरोनामुक्त होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण महिनाभरात पाचपटीने वाढले आहे. कोरोनामुक्तीचे तालुक्‍यातील प्रमाण महिन्यात 14.50 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. कालपर्यंत तब्बल 73.03 टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील कोरोनामुक्तीचे प्रमाण केवळ 58.58 टक्के होते. यावेळी विविध रुग्णालयांत कोरोनाशी दोन हात करणाऱ्या तालुक्‍यातील सात हजार 141 रुग्णांपैकी पाच हजार 215 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तोच कोरोनामुक्तीचे शहरातील प्रमाण 83.39 टक्के आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांबरोबर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढतीच आहे. 

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केवळ 672 नागरिक कोरोनामुक्त झाले होते. ती कोरोनामुक्ती कालपर्यंत पाच हजार 215 वर गेलेली आहे. ही आकडेवारी अत्यंत दिलासादायक असून, कोरोनावर योग्य उपचार केल्यास तो बरा होतो, हेच यातून सिद्ध होत आहे. शहरातील बांधितांची संख्या एक हजार 372 आहे. त्यात तब्बल एक हजारांवर नागरिक बरे झाले आहेत. शहरातील कोरोनामुक्ती 83.39 टक्‍के इतकी आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली आहे.

ऑगस्टच्या सुरवातील काही दिवसांपूर्वी केवळ 36 टक्के असलेली कोरोनामुक्तीची शहरातील टक्केवारी 83 टक्के झाली आहे. शहरातील कोरोनामुक्तीचा टक्का 83.39 टक्के आहे. शहरात ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे. तालुक्‍यातील कोरोनामुक्तीची आकडेवारी 58 टक्‍क्‍यांवरून 73 टक्‍क्‍यांकडे गेली आहे. आरोग्य विभागासह शहरात पालिका, नागरी आरोग्य केंद्राने ज्या उपाययोजना राबवल्या आहेत, त्याचा चांगला परिणाम दिसतो आहे. नागरिकांचा सहभाग व त्यांच्यात झालेली जागृती महत्त्वाची ठरते आहे.

तालुका, शहरात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण मोठे आहे. रुग्णांची संख्या तिपटीने वाढल्याने जूननंतर चौपटीने रुग्ण वाढत आहेत. जुलैला 300 तर ऑगस्टला एक हजार 147 रुग्ण झाले. तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सहा हजार 256 रुग्ण झाले. सध्या सात हजार 142 रुग्ण आहेत. शहरात एक हजार 371 रुग्ण आहेत. तालुक्‍यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे शेकडा प्रमाण 73 टक्‍क्‍यांकडे सरकले आहे. त्यापूर्वीच्या आठ दिवसांपूर्वी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, आरोग्य विभागाच्या उपाययोजनांचा परिणाम झाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73 टक्‍क्‍यांकडे सरकले आहे. 

तालुक्‍यावर एक नजर... 

* तालुक्‍यात कोरोनाग्रस्त - 7 हजार 142 
तालुक्‍यातील कोरोनामुक्ती - 5 हजार 215 
रुग्णालयांत उपचारार्थ दाखल - 1 हजार 715 
कोरोनाबाधित मृत्यू - 213 

संपादन : पांडुरंग बर्गे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Increase In The Number Of Patients Recovering From Corona Infection In Karad Taluka