esakal | कोयना धरण पायथा वीजगृह सुरू करण्याचे संकेत, महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

सहा वर्षांपासून धरणाच्या डाव्या तिरावर 80 मेगावॉट क्षमतेचे वीजगृह मान्यता संपल्यामुळे बंद आहे. ते सुरू करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कालच्या दौऱ्यात त्यावर चर्चा झाली असून, तो प्रकल्प सुरू करण्याचे संकेत मिळाले आहेत. 

कोयना धरण पायथा वीजगृह सुरू करण्याचे संकेत, महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : उच्चांकी पावसामुळे सातारा, सांगली जिल्ह्यांला महापुराचा सामना करावा लागतो आहे. त्या महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी कोयना धरणाच्या पायथा वीजगृह कुचकामी ठरत आहे. ऐन लढाईत कोयनेचे युनिट बंद पडत असते. दर वर्षी निर्माण होणाऱ्या महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी धरणाच्या उजव्या काठावरील अर्धवट अवस्थेत बंद पडलेल्या पायथा वीज गृहाच्या बहुउद्देशीय प्रकल्प पूर्ण कार्यान्वित करण्याला "हिरवा कंदील' मिळाला आहे.

शासनाला तातडीने त्याचे काम हाती घ्यावे लागणार आहे. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे. त्यामुळे कोयना जलविद्युत प्रकल्प येथे आहे. सिंचनासह वीजनिर्मिती येथे होते. कोयना धरणाच्या उजव्या पायथाजवळ कोयना धरणाच्या निर्मितीनंतर 1975 मध्ये 20 मेगावॉट क्षमतेचे दोन जनित्र बसवून वीजनिर्मितीसाठी विद्युतगृह उभारले. पूरकाळात व सिंचन व बिगर सिंचनासाठी धरणातून सोडण्यात येणारे पाणी वाया जाऊ नये असा त्यामागे हेतू होता. त्या वीजगृहातून वीजनिर्मिती करून पाणी पुढे सोडण्यात येते. सिंचन व वीज निर्मितीसह त्याचे फायदे अनेक झाले आहेत.

40 वर्षांपूर्वीचा जुना व केवळ दोन हजार 111 क्‍युसेक पाणी क्षमता असलेला वीजगृह आता बिघडला आहे. कोट्यवधी रुपये कमवून देणाऱ्या वीजगृह प्रकल्पाची क्षमता वाढवून बिघाड काढण्यास महानिर्मिती कंपनी अपयशी ठरली आहे. त्यामुळे 14 ऑगस्ट रोजी पायथा वीज गृह कार्यान्वित करण्याचे पत्र कोयना प्रशासनाने देऊनसुद्धा तांत्रिक बिघाड झाला. वीजगृह 15 ऑगस्ट रोजी एका युनिटवर सुरू झाले. 14 ऑगस्ट रोजी सुरू झाले असते तर पाणी सोडण्याची तीव्रता कमी झाली असती. सहा वर्षांपासून धरणाच्या डाव्या तिरावर 80 मेगावॉट क्षमतेचे वीजगृह मान्यता संपल्यामुळे बंद आहे. ते सुरू करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कालच्या दौऱ्यात त्यावर चर्चा झाली असून, तो प्रकल्प सुरू करण्याचे संकेत मिळाले आहेत. त्याद्वारे दहा हजार क्‍युसेक पाणीक्षमता वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यामुळे पावसाळ्यात विनावापर सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे महापुराचे गडद होणारे संकट दूर होण्यास मदतच होणार आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

loading image
go to top