कऱ्हाड : पोलिस निरीक्षक बकालेंना बडतर्फ करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

कऱ्हाड : पोलिस निरीक्षक बकालेंना बडतर्फ करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

कऱ्हाड : पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना नोकरीतुन बडतर्फ करावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.

निवेदनातील माहिती अशी जळगाव जिल्हा पोलीस दलातील एलसीबी विभागात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या किरणकुमार बकाळे याने जग, देश व राज्यातील प्रमुख असलेल्या मराठा समाजाबद्दल जातीवाचक ,समाजा-समाजात तेढ निर्माण होईल व मराठा समाजाची व मराठा स्त्रियांची बदनामी होईल असे वक्तव्य केले.

राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी याबाबत नाराजी व्यक्त करून निषेध केला. मराठा समाजातील महिला व पुरुषांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातील असे जाणीवपूर्वक आक्षेपार्ह विधान केले आहे. पोलीस प्रशासन मध्ये वरिष्ठ अधिकारी नेमके कोणते सामान मागतात. याबाबत चौकशी झाली पाहिजे.

याबाबत सर्व सामान्य लोकांना वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या चारित्र्य विषयी संशय निर्माण झाला आहे. एखाद्या शासकीय अधिकारी नोकराने अशा पद्धतीचे वक्तव्य करणे महाराष्ट्राला शोभा देणारे नाही. राज्याच्या पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढणारे आहे. अशी व्यक्ती पोलीस खात्यात राहणे हे समाजाच्या व नागरिकांच्या हिता विरुद्ध आहे. त्याना तत्काळ बडतर्फ करून अटक करावी.

Web Title: Satara Inspector Of Police Bakalen Dismissal Maratha Kranti Morcha Demand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..