
Satara : जखिणवाडीत डोक्यात पहार घालून वडीलांचा मुलाकडून खून
कऱ्हाड : घरगुती कारणावरून वडीलांच्या डोक्यात पहारीचा वार करून मुलानेच खून केला. जखीणवाडी येथे काल रात्री ही घटना घडली. आज सकाळी ती उघडकीस आली. त्या घटनेने परिसर हादरला आहे. शिवाजी नारायण पाटील (वय ६५) असे खून झालेल्या वडीलांचे नाव आहे. अर्जुन शिवाजी पाटील (वय ३५) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन व त्याचे वडील शिवाजी यांच्यात घरगुती वाद होता. त्यावरून दोघात वाद होता. अर्जुन बांधकाम व्यवसायवर कामगार आहे. काल रात्री झोपलेल्या बापाच्या डोक्यात पहार घालून त्यांचा खून केला. त्या घटनेनो कुटूंबिय हादरले. नातवानो त्वरीत त्यांना रात्रीच कृष्णा रूग्णालयात दाखल केले.
मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रूग्णालय सुत्रांनी सांगितले. सकाळी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस त्वरीत घटनास्थऴी पोचले. सकाळी नेहमीप्रमाणे अर्जुन कामावर गेला होता. त्याला त्याच्या कामवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याबाबतची नोंद करण्याची प्रक्रीया सुरू होती.