esakal | सातारा : जलजीवन मिशनमध्ये कऱ्हाड पाटणातील 61 गावांचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

jaljivan mission

सातारा : जलजीवन मिशनमध्ये कऱ्हाड पाटणातील 61 गावांचा समावेश

sakal_logo
By
हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः पाटण, कऱ्हाड तालुक्यांतील अनेक गावच्या नळ पाणीपुरवठा योजना कालबाह्य, नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे गावांना व वाड्यावस्त्यांना पाणीटंचाई भासत असल्याने येथील नळ पाणीपुरवठा योजना नव्याने करण्यासंदर्भात संबंधित गावांतील ग्रामस्थांनी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून मंत्री देसाई यांनी पाटण तालुक्यातील ५०, तर कऱ्हाडच्या सुपने मंडलांतील ११ अशा ६१ पाणी योजनांचा जलजीवन मिशन योजनेत समावेश करून घेतला आहे.

हेही वाचा: राज्याचा मोठा निर्णय; आमदारांना मिळणाऱ्या विकासनिधीमध्ये वाढ

पाटण तालुका हा डोंगरी व दुर्गम भागामध्ये वसलेला तालुका आहे. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरी भागामधील अनेक गावांच्या व वाड्यावस्त्यांकरिता अस्तित्वात असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना कालबाह्य व नादुरुस्त झाल्या असल्याने याही नळ पाणी योजनांची तातडीने पुनर्बांधणी करणे गरजेचे होते. त्याचा विचार करून मंत्री देसाई यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील काळोली, सडानिनाई(सडावाघापूर), चाफळ, जंगलवाडी (जाधववाडी- चाफळ), पाडळोशी, तावरेवाडी (पाडळोशी), मसुगडेवाडी (पाडळोशी), बोर्गेवाडी (घोट), फडतरवाडी (घोट), नुने, पांढरेपाणी (आटोली), आटोली, गव्हाणवाडी, बेंदवाडी, माळवाडी, सवारवाडी, कडवे, धामणी, रुवले, मरळोशी, लोटलेवाडी (काळगाव), काळगाव, डाकेवाडी (वाझोली), शिद्रुकवाडी (काढणे), पाळशी, लोहारवाडी (काळगाव), कामरगाव, मानाईनगर, आवसरी (काठी), पाचगणी, काहीर, कडवे खुर्द, रेडेवाडी, डोणीचावाडा (वांझोळे), नहिंबे चिरंबे, ताईगडेवाडी, तळमावले, भारसाखळे, विठ्ठलवाडी (शिरळ), करपेवाडी (काळगाव), जळव, कातवडी, येराडवाडी, सदुवर्पेवाडी, चेणगेवाडी, सळवे, चाळकेवाडी, चव्हाणवाडी (धामणी), ठोमसे, मारुल तर्फ पाटण, आडूळ, निगडे, पाचुपतेवाडी- आंबवडे खुर्द, भिकाडी, मिसाळवाडी, धनगरवाडा (मरड), मसुगडेवाडी, दाढोली, तर सुपने मंडलातील आबईचीवाडी, गमेवाडी, केसे, बेलदरे, साजूर, उत्तर तांबवे, वस्ती साकुर्डी, पश्चिम सुपने, आरेवाडी, पाडळी (केसे), डेळेवाडी या गावांतील ६१ योजनांचा समावेश आहे. पाणीपुरवठा योजनांची अंदाजपत्रके आवश्यक त्या कागदपत्रांसह तातडीने तयार करण्यात येऊन या नळ पाणीपुरवठा योजनांचा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजुरीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

loading image
go to top