सातारा : जावली बँक निवडणुकीत ९९ उमेदवार

बिनविरोधच्या हाकेला उमेदवारांची साद मिळेल
 Jawali Co-operative Bank Election
Jawali Co-operative Bank Electionsakal

भिलार : दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण १७ जागांसाठी १३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, १७ जागेसाठी ९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संदीपान माटे यांनी दिली आहे.

१७ जागांसाठी ९९ अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होणार अशी चर्चा असली, तरी ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे नेत्यांच्या बिनविरोधच्या हाकेला उमेदवारांची साद मिळेल, असे तरी सध्या वातावरण आहे. येत्या सोमवारी २७ जून रोजी अर्जांची छाननी होणार असून, किती अर्ज वैध ठरतील हे त्यादिवशी समजणार आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

त्यानंतर २८ जून ते १२ जुलै दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, त्यामध्ये कोण कोण माघारी घेते आणि त्यानंतरच नेत्यांचा कस बिनविरोधसाठी लागणार आहे. सर्वसाधारण १२ जागेसाठी ७६ उमेदवार, महिला राखीव दोन जागेसाठी १० जागा, अनुसूचित जातीच्या १ जागेसाठी ४, इतर मागासवर्गीय १ जागेसाठी ४ अर्ज असे एकूण १७ जागेसाठी ९९ उमेदवार रिंगणात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com