

सातारा : सातारा- जावळी तालुक्यातील वाडीवस्तीवर विकासकामे झाली असून, रस्त्यांच्या जाळ्यांमुळे सर्वसामान्य जनता विकासाच्या प्रवाहात आली आहे. सातारा व जावळी तालुक्यातील दुर्गम भागामध्ये पर्यटनवाढीच्या योजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
पर्यटनासह रोजगार आणि व्यवसायवृद्धीला प्राधान्य दिले आहे. विकासाच्या बाबतीत आपला मतदारसंघ राज्यात अग्रेसर आहे, हे सर्वमान्य आहे. असे असताना खुज्या आणि कोत्या वृत्तीच्या विरोधकांना विकास कसा दिसेल? काडीचे काम न करणाऱ्यांनी कितीही साळसुदपणाचा आव आणला तरी जनता भुलणार नाही. जनतेच्या प्रेम आणि पाठबळावर माझा विक्रमी विजय होणार असल्याचे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
येथे आबालवृद्धांसह मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘मी निवडणुकीपुरते राजकारण करणारा माणूस आहे. निवडणुकीनंतर जनतेच्या समस्या सोडवण्याला मी नेहमीच प्राधान्य दिले आहे आणि यापुढेही देणार आहे. विरोधी उमेदवाराला जिल्हा परिषदेला मी निवडून आणले. शिक्षण सभापती केले.
त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांना कशाचीही जाण नाही. जनाची नाही किमान मनाची तरी लाज बाळगायला हवी. गेल्या पाच वर्षात एकाही गावात न फिरणारे आता जनतेसमोर जाऊन मोठमोठ्या थापा मारत आहेत. ज्याने कोयना प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले.
तो स्वतःला कोयनेचा सुपुत्र म्हणतो. जावळीचा सुपुत्र म्हणतो. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्यांनी जनतेबद्दल खोटा कळवळा आणू नये. तुमच्या म्हणण्याने मतदारसंघात झालेला विकास पुसून जाणार नाही, याचे तरी भान ठेवले पाहिजे. मी जनतेचा सेवक आहे. जनतेसाठी मी अहोरात्र उपलब्ध असतो. कोणी कितीही भूलथापा मारल्या तरी जनता माझ्यासोबत आहे.’’
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.