Satara : ‘जिहे-कटापूर’साठी मी मंत्री असतानाच निधी मंजूर ; शशिकांत शिंदे

कोरेगाव आणि खटावमध्ये वाद पेटवण्यासाठी खटाव तालुक्यातील सामान्य लोकांना
शशिकांत शिंदे
शशिकांत शिंदेsakal

पळशी : मी आमदार आणि जलसंपदामंत्री झाल्यावर जिहे-कटापूर योजनेसाठी सर्वाधिक २८९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळेच नेर तलावामध्ये पाणी पडू शकले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मी या योजनेसाठी काहीच केले नाही, हा आरोप धादांत खोटा आहे, अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांचा नामोल्लेख टाळून टीका केली, तसेच आंदोलनामध्ये झालेले आरोप त्‍यांनी फेटाळले.

रामोशीवाडी (ता. कोरेगाव) व परिसरातील गावांना जिहे-कटापूर योजनेतून पिण्याचे पाणी देण्याला विरोध करण्यासाठी पुसेगाव, खटाव येथे झालेल्या आंदोलनामध्ये केल्या गेलेल्या आरोपांना आमदार शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, की रामोशीवाडी (ता. कोरेगाव) व परिसरातील गावांना जिहे-कटापूर योजनेतून पिण्याचे पाणी देण्याला विरोध करण्यासाठी पुसेगाव, खटाव येथे झालेल्या आंदोलनामागचा बोलविता धनी एकाच वेळी आंदोलनकर्त्यांची आणि कोरेगाव तालुक्यातील गावांची दुहेरी फसवणूक करत असून,

कोरेगाव आणि खटावमध्ये वाद पेटवण्यासाठी खटाव तालुक्यातील सामान्य लोकांना आंदोलनाच्या माध्यमातून पुढे करण्याचे घाणेरडे राजकारण या योजनेचे नाव बदलण्याशिवाय काहीही न करणाऱ्यांकडून सुरू आहे, त्याचबरोबर नेर तलावाच्या वरच्या परिसरातील काळेवाडी, पांढरवाडी, रणसिंगवाडी, डिस्कळ, गांधीनगर, रामोशीवस्ती, जळकेमळा, अनपटवाडी, चिंचणी, मोळ, तसेच कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी,

शेल्टी, खिरखिंडी, भंडारमाची, चिमणगाव, भाटमवाडी, वाघजाईवाडी, जायगाव, एकंबे या गावांचा समावेश लाभक्षेत्रामध्ये करण्यासाठीचा ठराव नियामक मंडळाच्या बैठकीत केला. मध्यंतरीच्या काळात नेर परिसरातील गावांना ग्रॅव्हिटीने बंदिस्त पाइपलाइनद्वारे तलाव भरून पाणी देण्याची मागणी मी स्वतः तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. ही वस्तुस्थिती असताना ‘पाणी आम्हीच आणले,’ असे लोकांची फसवणूक करणाऱ्यांकडून दाखवले जात आहे.

दरम्यान, लाभक्षेत्राच्या बाहेरील कोरेगाव, खटाव, माण, सातारा तालुक्यांतील गावांना पाणी देण्याची मागणी मी स्वतः तसेच खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, महेश शिंदे, डॉ. दिलीप येळगावकर, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी आदींनी केली आहे. त्याचबरोबर राजेवाडी (जि. सांगली) येथील तलावाचा समावेश जिहे- कटापूर योजनेचा टेल टॅंक म्हणून करण्याची मागणी खासदार संजय पाटील,

सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केली आहे. या सर्वांच्या मागणीनुसार ६३ हजार ४३२ हेक्टरसाठी ८.२० टीएमसी पाणी लागणार आहे. मग या सर्वांनाच विरोध करणार का? असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

रामोशीवाडीच्या व्हॉल्व्हबाबत दुटप्पीपणा

एकीकडे रामोशीवाडीच्या व्हॉल्व्हमधून परिसरातील गावांना पिण्याचे पाणी देण्याला विरोध करण्यासाठी खटावच्या लोकांना आंदोलनासाठी पुढे करायचे आणि दुसरीकडे मात्र, रामोशीवाडी येथील व्हॉल्व्हमधूनच शेल्टी, खिरखिंडी, वाघजाईवाडीसह परिसरातील गावांना पाणी देण्याबरोबरच भाडळे,

अंबवडे, किन्हई, चंचळी, खेड, जांब, हिवरे, कवडेवाडी, भोसे, चिमणगाव, भंडारमाची या गावांनाही पाणी देण्याची मागणी गेल्या ३१ जानेवारी रोजीच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत विद्यमान लोकप्रतिनिधींनी करायची, ही कोरेगावकरांसह खटावकरांचीही फसवणूक नव्हे काय? असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com