
सातारा : नोकरीचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार
नागठाणे : विवाहितेला नोकरीचे आमिष दाखवून व तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी सासपडे (ता. सातारा) येथील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंकज मोहन यादव (रा. सासपडे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. पंकज याने त्याच्या नात्यातील एका विवाहितेला ‘बँकेत नोकरी लावतो. त्यासाठी तुला कॉम्प्युटर क्लास लावावा लागेल. मी तुला क्लास लावतो,’ असे आमिष दाखविले. त्यानंतर घरात कोणीही नसताना त्याने तिच्याशी बळजबरी करत अत्याचार केला.
हेही वाचा: Omicron : आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी RT-PCRचे प्री-बुकिंग अनिवार्य
या वेळी तिचे अश्लील फोटो काढून ‘ही घटना कोणाला सांगितल्यास तुझे फोटो व्हायरल करेन. तुझा नवरा व मुलाला ठार मारेन,’ अशी धमकी दिली. त्यानंतर पंकजने वेळोवेळी तिच्यावर सातारा येथे लॉजवर व घरी अत्याचार केला. पीडित विवाहितेने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला असता त्याने नवरा व भावाला ठार मारण्याची पुन्हा धमकी दिली. या घटनेची माहिती अखेर संबंधित विवाहितेने कुटुंबीयांना दिली. त्यानंतर त्यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पंकज यादवच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ तपास करत आहेत.
Web Title: Satara Job Married Women Rape Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..