कास पठारावर फुलं कधी बहरणार? फुलांच्या संरक्षणासाठी बसवली जात आहे तंगुसाची जाळी, हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरु

Kaas Plateau Flowers Satara Tourism : कास पठार विविध रंगी फुलांसाठी (Flower Season) प्रसिद्ध आहे. या महिन्याच्या शेवटाला झालेल्या पावसामुळे कास पठार हिरवेगार झाले असून काही प्रदेशनिष्ठ फुलांचे तुरळक दर्शन होवू लागले आहे.
Kaas Plateau Flowers Satara Tourism
Kaas Plateau Flowers Satara Tourismesakal
Updated on

कास (सातारा) : जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर (Kaas Plateau) फुलांच्या परिसराचे संरक्षण करण्यासाठी तंगुसाची जाळी बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली असून आगामी हंगामाच्या दृष्टीने हे काम महत्त्वपूर्ण आहे. जाळी बसवण्यात येत असली तरी कास पठारावर फुले बहरण्यास अवकाश असून आगामी हंगाम हा पंधरा ऑगस्ट नंतरच सुरू होत असतो. त्यामुळे आता फुले बघण्याच्या आशेने येणारांची निराशा होवू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com