कांची कामकोटी मठातर्फे होणार आयुष्य होम

karad
karad

सातारा ः कांचीपुरम्‌ येथील श्री कांची कामकोटी मठाचे श्री श्री जयेंद्र सरस्वती स्वामींच्या जयंती व श्रीराम मंदिराच्या शिलान्यास कार्यक्रमाच्या निमित्ताने बुधवारी (ता. 5) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

स्वामींची जयंती व श्रीराम मंदिराचा शिलान्यास एकाच दिवशी होणे हा एक योगायोगच आहे. श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी स्वामींनी प्रयत्न केले होते. दोन्ही धर्मांमध्ये सामंजस्य आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न करताना मध्यस्थाची भूमिका निभावली. कांची पिठाचे विद्यमान पीठाधिश्‍वर श्री श्री शंकरविजयेंद्र सरस्वती स्वामींच्या आज्ञेनुसार बुधवारी कांचा कामकोटी मठासह अन्य शाखांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होतील. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन केलेल्या लॉकडाउनमधील नियमांचे पालन करत महारोग निवारण, सकल जीवराशींच्या कल्याण व आरोग्यासाठी श्री गणेश होम, नवग्रह होम, आयुष्य होम, आवाहंती होमाचे आयोजन करण्यात येणार आहे. श्रीराम मंदिराच्या निर्माणाच्या यशासाठी श्रीराम नामजप-यागही होईल. 

या दोन्ही कार्यक्रमांमुळे मठाच्या भक्‍तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या महामारीच्या काळात जागरुक नागरिकाप्रमाणे लॉकडाउनमधील नियमांचे पालन करत आपल्या घरी राहून नाम-जप करून सहकार्य करावे, असे आवाहन मठातर्फे भाविकांना करण्यात आले आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com