मुख्याधिकाऱ्यांचा फंडा; हे उपाय करा अन्‌ कोरोनाला टाळा

मुख्याधिकाऱ्यांचा फंडा; हे उपाय करा अन्‌ कोरोनाला टाळा
Updated on

कऱ्हाड (जि.सातारा) : पालिकेच्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ दिल्याने शहर कोरोनापासून दूर आहे. सध्या शासनाच्या धोरणानुसार परराज्यांसह जिल्ह्यातून विशेष करून मुंबई, पुण्यातून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शहराची बाजारपेठ सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पालिकेने "मीच माझा रक्षक' अभियान सुरू केले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली.
 
ते म्हणाले,"" शहर परिसरातील कोरोनाचा फैलाव निश्‍चितच रोखला जाऊ शकतो. त्यासाठी मीच माझा रक्षक असा उपक्रम हाती घेत आहोत. त्यासाठी केलेल्या नियमांची अंमलबजावणी सर्वांनी करावी. मीच माझा रक्षक उपक्रमात दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकांची नोंद करावी, त्याने मास्क घातला असेल तरच मालविक्री करावी. आलेल्या ग्राहकांच्या हातावर सॅनिटायझर द्यावे. दुकानातील कामगार कोरोनाबाधित गावातून येत असल्यास त्यांना तात्पुरती सुटी द्यावी. काउंटरवर गर्दी न करता सामाजिक अंतराचे नियम पाळून विक्री करावी. सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्यांनी कडी, कोयंडा, नळ आदी वस्तूंशी कमीतकमी वेळा स्पर्श करावा व त्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. यामध्ये काही त्रुटी असल्यास पालिकेशी संपर्क साधावा. भाजीपाला व फळविक्रेत्यांनी आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. रस्त्यावरून चालताना एकमेकांत अंतर ठेवून चालावे, कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नये, हाताचा स्पर्श चेहऱ्याला करणे शक्‍यतो टाळावे. अनावश्‍यक गर्दी करू नये. कोणाशीही दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ संपर्क साधू नये. भाजीपाला व फळे घरी आल्यावर दोन तास बाजूला ठेवावीत. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन ठेवाव्यात. शहरात फिरताना मास्कचा वापर करणे आवश्‍यक आहे.'' 

शहरात, घरात विलगीकरण केलेल्यांनी घरातच थांबायचे आहे. असे लोक बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 
यशवंत डांगे, मुख्याधिकारी, कऱ्हाड
 

ही पहा माणुसकीची झलक; जाणत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी

गृहिणींसाठी महत्वपुर्ण बातमी; साडे चार लाख ग्राहकांना लाभ कंपनीचा दावा

मलाईका अरोरा घेतेय विटॅमिन डी थेरपी, काय आणि कशासाठी आहे ही थेरपी वाचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

India Vikram 1 Rocket Success Phaltan Engineer Sanket Kadam Shines in Historic Private Space Mission
Koyna River water release alert
Artificial Buffalo Milk Case Couple Arrested in Karad Following Food and Drug Administration Action
Latest Koyna Dam storage report
Marathi News Esakal
www.esakal.com