
कऱ्हाड (जि. सातारा) : तालुक्यात आज मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये शेणोली स्टेशन येथील सात जणांसह म्हासोली, वानरवाडी येथील प्रत्येकी तीन, करपेवाडी, तामिनी (पाटण), साकुर्डी, सदुर्पेवाडी आणि गलमेवाडी येथील प्रत्येकी एक अशा 18 कोरोनामुक्तांचा समावेश आहे. शेणोली स्टेशन येथे 36 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय युवक, सात वर्षीय मुलगी, 13 वर्षीय मुलगी, म्हासोली येथील 15 वर्षीय मुलगा, 14 वर्षीय मुलगा, 12 वर्षीय मुलगा, वानरवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, 17 वर्षीय मुलगा, 29 वर्षीय मुलगा, करपेवाडी येथील येथील 16 वर्षीय मुलगा, कामिनी-पाटण येथील 25 वर्षीय युवती, साकुर्डी येथील 27 वर्षीय युवक, सदुर्पेवाडी येथील चारवर्षीय मुलगी, गलमेवाडी येथील 12 वर्षीय मुलगी बाधित झाल्याने काही दिवसांपासून कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डात उपचार घेत होते. त्यांचे उपचारानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज दिला.
या वेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, कृष्णा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, प्रसूतीरोग तज्ज्ञ डॉ. एन. एस. क्षीरसागर, डॉ. अमोल गौतम, डॉ. अर्चना रोकडे, डॉ. दिग्विजय कदम, डॉ. अश्वती विश्वनाथ, डॉ. विनीत चौधरी, डॉ. श्रद्धा शेटे, डॉ. सुशील घारगे, डॉ. स्तुती उगिले, डॉ. आशुतोष बंडगर, डॉ. अनिकेत सुरुशे यांच्या हस्ते कोरोनामुक्त रुग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार झाला. या वेळी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहायक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर आदींसह हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, सह्याद्री हॉस्पीटल येथून कोरोनामुक्त झालेल्या 10 रुग्णांना आज टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. यात शेणोली स्टेशन येथील 60 वर्षीय पुरुष, वानरवाडी येथील 66 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष आणि दोन पुरुष, मलकापूर येथील 75 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 42 वर्षीय पुरुष, बहुलेवाडी येथील 51 वर्षीय महिला आदींचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.