काेराेनातील माणुसकी : रस्त्याकडेला पडलेल्या वृद्धास युवकांचा आधार

काेराेनातील माणुसकी : रस्त्याकडेला पडलेल्या वृद्धास युवकांचा आधार
Updated on

कऱ्हाड : आजच्या युवा पिढीला कशाचीही तमा नाही. त्यांच्या समज नाही, अशी चर्चा सध्या समाजात अनेक जाणकारांतून होत असते. मात्र त्या चर्चेला व त्या माणसिकतेला कलाटणी देणारी घटना कऱ्हाडच्या कृष्णा घाटावर नुकतीच घडली. तेथील तिघा युवकांनी माणुसकी दाखवत कृष्णा घाट परिसरात जखमी अवस्थेत रस्त्याकडेला पडून राहिलेल्या वयोवृद्ध व्यक्तीवर वैद्यकीय उपचार करून त्याच्या नांदलापुर येथील घरी सोडले. खास रूग्णवाहिका बोलावून त्या वृद्धास घरी सोडण्यासाठी विनायक मोहिते, मनोज पवार व अजिंक्य सोनवणे यांनी विशेष प्रय़त्न केले. त्यांच्या या कृतीची सर्वत्र काैतुक हाेत आहे. 

येथील कृष्णा घाटावर एक व्यक्ती निपचीत पडली होती. ती हालत होती. मात्र काहीही बोलत नव्हती. काही लोकांना जवळ जावून अंदाज घेतला. त्यावेळी ती व्यक्ती व्यूव्हळत असल्याचे जाणवले. त्यातील काही लोकांनी पालिकेचे नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांना ती माहिती दिली. काही कार्यकर्त्यांनी कृष्णा घाट परिसरात एक वयोवृद्ध व्यक्ती जखमी असे रस्त्याकडेला पडला आहे, अशी माहिती वाटेगावकर यांना दिली. श्री. वाटेगावकर यांनी जावून पाहिले. त्यावेळी त्या संबधाताच्या पायाला जखम होती. त्यामुळे त्यांना चालता येत नव्हते. संबधित व्यक्तीची ओळख त्यांनी पटवली. लक्ष्मण माळी असे त्यांचे नाव असल्याचे त्यांनी सांगितले.

नादंलापूर येथे राहत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या मुलीचा दूरध्वनी क्रमांक दिला. श्री. वाटेगावकर यांच्या सोबत आलेल्या विनायक मोहिते, मनोज पवार व अजिंक्य सोनवणे यांना त्या क्रमांकावर फोन लावून खात्री करण्यास सांगितले. खात्री झाल्यानंतर संबधित वृद्ध व्यक्तीच्या जखमेवर उपचार त्यांनी उपचार केले. त्या व्यक्तीला घरी सोडण्यासाठी त्यांनी खास रूग्णवाहीका मागवली. त्या संबधित व्यक्तीला त्या रूग्णावाहीकेतून त्या युवकांनी घरी नेवून सोडले. त्यांच्या कुटूबियांनाही त्यांचे आभार मानले.

जवळवाडीतील युवकांचा जय हो! 

सातारा : लहान बालकांना झाला काेराेना; एकूण 40 बाधितांची वाढ

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmer Loss Assessment
Eknath Shinde Announces Crop Damage Panchanamas From October 5
Kas Plateau Flowers 2026
Clash Between Ruling and Opposition Factions at Sahyadri Sugar Factory AGM
Marathi News Esakal
www.esakal.com