
Satara: कऱ्हाड नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणात पुन्हा अव्वल; सलग चौथ्या वर्षी बहुमान
कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात पुन्हा एकदा पहिल्या पाच क्रमांकात बाजी मारली आहे. त्या पाचही पालिकांचा एक आॅक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणार आहे. त्याचे निमंत्रण पालिकेस मिळाले आहे.
कऱ्हाडसह जिल्ह्यातील पाचगणी, देवळाली कन्टानमेन्ट कॅम्प, नवी मुंबई व नगर कन्टामेंट कॅम्पचाही त्यात समावेश आहे. त्याही पालिकांचा निमंत्रण मिळाले आहे. कऱ्हाड पालिकेने यापूर्वी माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकला आहे. स्वच्छ सर्वेक्षणात पुन्हा एकदा पालिकेने देशपातळीवर अव्वल क्रमांक पटकावला आहे. सलग चार वर्षे पालिका स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल राहिली आहे. याही एक ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा बक्षीस वितरण आहे.
त्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या या पालिकांचा सन्मान होणार असून त्याच दिवशी त्याच कार्यक्रमात निकालही जाहीर होणार आहे. पहिल्या पाच पालिकांना त्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. २०१८ साली स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा सुरू झाली. त्यावेळेपासून पालिका सतत त्यात कायम अव्वल राहिली आहे. देशातील सव्वा लाख लोकसंख्येच्या गटात पालिका अव्वल राहिली आहे. मागील वर्षी काही तांत्रिक बदलाचे आव्हान स्पर्धेत यशस्वी झाली आहे.
मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य अभियंता आर.डी. भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, अभियंता ए आर पवार, मुकादम मारुती काटरे सर्व नगरसेवक आरोग्य कर्मचाऱ्यांनी चोख कामगिरी बजावली आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या केंद्रीय समितीने पाठवलेल्या निमंत्रणात महाराष्ट्रातील पाच पालिकांचा समावेश आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात सलग दोन वर्षी कऱ्हाडने प्रथम क्रमांक पटकावला होता. तिसर्या वर्षी दुसरा क्रमांक पटकवला होता. यंदाही पहिल्या पाच मध्ये समावेश झालेले आहे. याचा अंतिम निकाल व क्रमवारी एक आक्टोंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभातच घोषित करण्यात येणार आहे कराड नगरपरिषद पहिल्या दोन वर्षी सलग देशात प्रथम क्रमांक मिळवला होता तर तिसऱ्या वर्षी दुसरा क्रमांक मिळाला होता. यावर्षीही पालिका पहिल्या पाचमध्ये झळकली आहे.
प्रदर्शनातही सहभाग
दिल्ली येथे 29 व 30 सप्टेंबरला अव्वल ठरलेल्या पालिकांच्या स्वच्छ सर्वेक्षणातील कलाकृतींसह उपक्रमावर आधारित प्रदर्शन होत आहे. त्यातही पालिका सहभागी होणार आहे. दोन त्यानंतर एक आक्टोंबरला पारितोषिक वितरण आहे.