Satara : खंडाळा कारखाना कसा वाचवणार ते सांगा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Khandala Cooperative Sugar Factory

Satara : खंडाळा कारखाना कसा वाचवणार ते सांगा?

सातारा : किसन वीर कारखान्‍याचा भाग असणाऱ्या खंडाळा सहकारी साखर कारखान्‍याची लिलाव प्रक्रिया बँकेने जाहीर केली आहे. हा कारखाना लिलावात निघाल्‍यास ‘किसन वीर’सह शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. आमचे प्रस्‍ताव नाकारल्‍याने खंडाळा कारखान्‍यावर ही वेळ आली आहे. लिलावातून हा कारखाना कोणाच्‍या तरी हातात देण्‍याचा त्‍यांचा डाव असल्‍याचा प्रश्‍‍न शेतकऱ्यांना पडला आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी खंडाळा कारखाना कसा वाचवणार हे जाहीर करण्‍याची मागणी ‘किसन वीर’चे माजी अध्‍यक्ष, माजी आमदार मदन भोसले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. या वेळी त्यांनी आमदार मकरंद पाटील यांच्‍यासह जिल्‍हा बँकेचे अध्‍यक्ष नितीन पाटील यांच्‍यावर निष्‍क्रियतेचा आरोप केला.

निवडणुकीनंतर खंडाळा कारखाना सुरू करण्‍याचे आवाहन आम्‍ही परिवर्तन पॅनेलच्‍या आमदार मकरंद पाटील, नितीन पाटील यांना केले होते. त्यासाठी आम्‍ही त्‍यासाठीचा करार आठ दिवसांत उलटवून देणार होतो,

ते संस्थांच्या गळ्याला नख लावू शकतात

‘किसन वीर’च्‍या छत्रछायेखाली खंडाळा आणि प्रतापगड कारखाने सुरू होते. काही धोरणांमुळे नंतर त्‍यात अडचणी आल्‍या. यानंतरच्‍या निवडणुकीतील कौल आम्‍ही मान्‍य केला. सध्‍या ‘किसन वीर’चे व्‍यवस्‍थापन आमदार मकरंद पाटील यांच्‍याकडे आहे. एकही संस्‍था न उभारलेले, ‘खंडाळा’सारख्‍या सहकारी संस्‍थांच्‍या गळ्यांना नख लावू शकतात. एवढा निधी आणतो, जिल्‍हा बँकेकडून इतके कर्ज मिळवणार, अशा घोषणा करणाऱ्यांना जिल्‍हा बँकेने एक रुपयाही न दिल्‍याची माहिती मिळत असल्‍याचेही श्री. भोसले यांनी सांगितले.