Satara News: कोरेगावमध्ये सात सोसायट्यांत दुरंगी लढत

कुमठे, वाठार स्टेशन, नागझरी, वाघोली, विखळे, तडवळे संमत वाघोली आणि रेवडीचा समावेश
societies
societies sakal

कोरेगाव : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील कुमठे, वाठार स्टेशन, नागझरी, वाघोली, विखळे, तडवळे संमत वाघोली आणि रेवडी अशा सात विकास सोसायट्यांच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या काल शेवटच्या दिवशी दुरंगी लढत होत असल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुका १८ व १९ मार्च रोजी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

कुमठे विकास सेवा सोसायटीच्या १३ जागांसाठी २७ उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत. सर्वसाधारण आठ जागांसाठी १६, महिला राखीवमधील दोन जागांसाठी चार उमेदवार आहेत. इ

तर मागासवर्गमधील दोन जागांसाठी तीन उमेदवार, अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी दोन, तर विमुक्त जाती भटक्या जमातीमधील एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत.

वाठार स्टेशन विकास सेवा सोसायटीच्या १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत. सर्वसाधारण आठ जागांसाठी १६, तर महिला राखीवमधील दोन जागांसाठी चार उमेदवार आहेत.

इतर मागासवर्गमधील दोन जागांसाठी दोन उमेदवार, अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी दोन, विमुक्त जाती भटक्या जमातीमधील एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत.

नागझरी विकास सेवा सोसायटीच्या १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत. सर्वसाधारण आठ जागांसाठी १६, तर महिला राखीवमधील दोन जागांसाठी चार उमेदवार आहेत.

इतर मागासवर्गमधील दोन जागांसाठी दोन उमेदवार, अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी दोन, विमुक्त जाती भटक्या जमातीमधील एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत.

वाघोली विकास सेवा सोसायटीच्या १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत. सर्वसाधारण आठ जागांसाठी १६, तर महिला राखीवमधील दोन जागांसाठी चार उमेदवार आहेत.

इतर मागासवर्गमधील दोन जागांसाठी दोन उमेदवार, अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी दोन, विमुक्त जाती भटक्या जमातीमधील एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत.

विखळे विकास सेवा सोसायटीच्या १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत. सर्वसाधारण आठ जागांसाठी १६, तर महिला राखीवमधील दोन जागांसाठी चार उमेदवार आहेत.

इतर मागासवर्गमधील दोन जागांसाठी दोन उमेदवार, अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी दोन, विमुक्त जाती भटक्या जमातीमधील एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत.

तडवळे संमत वाघोली विकास सेवा सोसायटीच्या १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत. सर्वसाधारण आठ जागांसाठी १६, तर महिला राखीवमधील दोन जागांसाठी चार उमेदवार आहेत.

इतर मागासवर्गमधील दोन जागांसाठी दोन उमेदवार आहेत. अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी दोन, विमुक्त जाती भटक्या जमातीमधील एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत.

रेवडी विकास सेवा सोसायटीच्या १३ जागांसाठी ३३ उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत. सर्वसाधारण आठ जागांसाठी २१, तर महिला राखीवमधील दोन जागांसाठी पाच उमेदवार आहेत.

इतर मागासवर्गमधील दोन जागांसाठी दोन उमेदवार, अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी तीन, विमुक्त जाती भटक्या जमातीमधील एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com