Latest Koyna Dam storage update
esakal
कराड (सातारा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर परिसरात रविवारीपासून मंगळवारपर्यंत मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली (Koyna Dam storage latest update) आहे. धरणाने ६० टीएमसीचा टप्पा ओलांडला असून, मंगळवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणात ६१.३० टीएमसी पाणीसाठा झाला आहे.