दीड लाख सातारकर स्वगृही दाखल; कोरोना विषाणू संसर्गाचा वाढला प्रसार; प्रशासनासह नागरिकांचीही वाढली चिंता

दीड लाख सातारकर स्वगृही दाखल; कोरोना विषाणू संसर्गाचा वाढला प्रसार; प्रशासनासह नागरिकांचीही वाढली चिंता

सातारा : जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख लोक स्वगृही आले आहेत. त्यापैकी शासकीय नोंदीत केवळ एक लाख 52 हजार 263 लोकच आले आहेत. इतर राज्यांतून पाच हजार, इतर देशांतून एक हजार लोकांचा जिल्ह्यात प्रवेश झालेला आहे. त्यामुळे लॉकडाउन शिथिल होत असतानाही जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढू लागली आहे. ज्या गावांत कोरोना पोचला नव्हता, तेथेही रुग्ण आढळू लागल्याने जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम आहे.
पप्पीचा बायोपिक 

अडीच महिन्यांचे लॉकडाउन होऊनही कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1012 झाला असून, प्रत्यक्ष उपचार घेणारे कोरोनाचे रुग्ण 256 आहेत. आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 713 झाली आहे. सुमारे सव्वा लाख संशयित रुग्णांच्या स्त्रावांच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली आहे. वाढणारा कोरोनाचा वेग पाहता जिल्ह्याबाहेरून आलेल्या सातारकरांमुळेच संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाकडे नोंद करून जिल्ह्यात प्रवेश केलेल्या एक लाख 52 हजार 263 जणांचीच नोंद आहे. यापेक्षा अधिक संख्येने लोक स्वगृही आलेले आहेत. त्यांचा आकडा सुमारे साडेतीन लाखांकडे जात आहे. पण, लोक आम्हाला कोणताही संसर्ग नाही, असे म्हणून घरीच राहात आहेत. पण, ज्यावेळी लक्षणे दिसू लागतात, त्यावेळी प्रशासनासह स्थानिक लोकांचीही धावपळ उडत आहे. त्यावेळी सदर बाधित हा किमान 70 लोकांशी संपर्कात आल्याचे उघड होते.
 
बाहेरच्या जिल्ह्यांतून सातारा जिल्ह्यात येणाऱ्यांचे प्रमाण आजही कायम आहे. तरीही काही जण नोकरी, व्यवसायानिमित्त असल्याने ते पुन्हा पुणे, मुंबईकडे जात आहेत. पण, त्यांची संख्या अल्प आहे. आतापर्यंत बाहेरच्या राज्यातून पाच हजार 119 लोक साताऱ्यात स्वगृही आले आहेत. तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील साधारण एक लाख 48 हजार 230 नागरिक आले आहेत. यामध्ये कोल्हापुरातून 5108, नगरमधून 1743, ठाणे 22 हजार 881, पालघर 7164, पुण्यातून 25 हजार 719, मुंबईहून 37 हजार 782, रायगडमधून 21 हजार 826, सांगली 7174, सोलापूर 4460 अशी प्रमुख जिल्ह्यांतून लोक साताऱ्यात आले आहेत.

सिव्हिलमधील डायलिसिस यंत्रणा सुरू; हजारो रुपये वाचणार 

आजही मोठ्या प्रमाणात परवानगी काढून व विनापरवानगीनेही लोक सातारा जिल्ह्यात येत आहेत. त्यांनी काळजी न घेतल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आता जी गावे कधीही कोरोनाच्या संपर्कात नव्हती, अशा गावांत कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे लॉकडाउन शिथिल होत असताना नागरिकांत पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनावर उपचार होऊन बरे होणाऱ्यांचे प्रमाण चांगले असले तरी कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासह नागरिकांतही अस्वस्थता वाढली आहे. 

विविध तालुक्‍यांत आलेले नागरिक 

जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांत बाहेरून आलेल्या स्थानिक नागरिकांची संख्या अशी : कऱ्हाड 20 हजार 732, कोरेगाव 9,739, खटाव 15 हजार 477, खंडाळा 7,153, जावळी 9,797, पाटण 16 हजार 096, फलटण 10 हजार 745, महाबळेश्‍वर 8,935, माण 13 हजार 110, वाई 11 हजार 884, सातारा 29 हजार 595. 

Video : सातारा जिल्ह्यात दोघांचा मृत्यू; 25 पुरुष,13 महिला कोरोनाबाधित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com