कडक सॅल्यूट! कोरेगावच्या जांबाज पोलिस अधिकाऱ्याचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

गिरीश चव्हाण
Monday, 25 January 2021

भरत नाळे सध्या कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपनिरीक्षकपदी कार्यरत आहेत.

सातारा : जिल्हा पोलिस दलात उपनिरीक्षकपदी कार्यरत असणाऱ्या भरत ज्ञानदेव नाळे यांना उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. पदक जाहीर झालेले नाळे हे कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात सध्या कर्तव्यास आहेत.

राज्यातील 57 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतीपदक जाहीर झाले असून त्याबाबतचे निवेदन केंद्रीय गृह विभागाच्या वतीने नुकतेच प्रसिध्द झाले आहे. राष्ट्रपतीपदक प्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा पोलिस दलातील नाळे यांचा समावेश आहे. नाळे हे 1983 साली पोलिस दलात शिपाईपदी भरती झाले होते. यानंतर त्यांना खात्यांतर्गत विविध पदांवर पदोन्नती मिळाली. 2013 साली खात्यांतर्गत परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर नाळे यांना पोलिस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली. नाळेंनी सातारा शहर, सातारा तालुका, कराड शहर, मुख्यालयात सेवा बजावली आहे. 

भारत माता की जय, वंदे मातरम्‌च्या जयघोषाने दुमदुमला मालवणचा किनारा

नाळे सध्या कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात उपनिरीक्षकपदी कार्यरत आहेत. त्यांना या काळात केलेल्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदक आज जाहीर झाले. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होते. कोरेगाव हे नाळे यांचे मुळ गाव आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Latest Marathi News Police Bharat Nale Honored With President Medal