हा नेता म्हणाला... नियमांचे काटेकोरपणे पालन करा

सचिन शिंदे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

व्यापाऱ्यांची, व्यावसायिकांची मागणी व समाजाची गरज ओळखून जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनमध्ये शिथीलता देत सकाळी नऊ ते सात या वेळे दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या अनलॉकमध्ये रस्त्यांवर गर्दी झाल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याचीही भिती आहे. 

कऱ्हाड (जि. सातारा) ः केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउनमध्ये शिथिलता केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही एक ऑगस्टपासून नवीन आदेशाची अंमलबजावणी होत आहे; पंरतु काही सुरळीत झाले असा त्याचा अर्थ न काढता जनतेने शासनाच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे, तरच अनलॉकचे यश मिळेल, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

काही दिवसांपूर्वी कऱ्हाडमध्ये लॉकडाउनच्या संदर्भात व्यापारी असोसिएशन व प्रमुख व्यापाऱ्यांसोबत माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. त्या चर्चेत सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याची वेळ वाढवून किमान आठ तास असावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार आमदार चव्हाण यांनी जनता, व्यापाऱ्यांची गैरसोय दूर व्हावी, या अनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी चर्चा केली. जिल्हा अन"लॉक'च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढत व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची वेळ सकाळी 9 ते रात्री 7 अशी केली.

त्याबाबत आमदार चव्हाण म्हणाले, ""व्यापाऱ्यांच्या मागण्यांमध्ये प्रमुख मागणी दुकाने उघडण्याची वेळ वाढवण्याची होती. जनतेशीसुद्धा चर्चा केल्यानंतर त्यांच्यासुद्धा मागणीत एकवाक्‍यता होती. त्यामुळे सर्व व्यवहार दैनंदिन पद्धतीने सुरळीत सुरू व्हावेत. त्या अनुषंगाने जनता व व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार जिल्ह्यात लॉकडाउन शिथिलता आणली आहे. ती सोयीसाठी आहे, याची जाणीव ठेवत बाजारपेठेत वावरावे, दुकानांत सामाजिक अंतराचे पालन करावे, मास्कचा वापर आवर्जून करावा. कोरोनाचे संकट टळलेले नाही. अधिक गडद होत आहे. त्यासाठी शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले, तरच सातारा अन"लॉक'ला यश मिळेल. 

सातत्याने जनतेशी संवाद 
पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाउन सुरू ते अन"लॉक' काळातही जनतेशी थेट संवाद कायम ठेवला आहे. त्या संवादातूनच जिल्ह्यात लॉकडाउनच्या वेळी जनतेच्या समस्या सोडविल्या गेल्या. चव्हाण यांनी जनतेशी संवाद ठेवल्याने लॉकडाउनमध्ये वेळोवेळी शिथिलता आणली गेली आहे. ती शिथिलता जनतेला दिलासा देणारी ठरली आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

व्वा..! सवंगड्यांनी थाटला घरगुती राखी उद्योग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara This leader said ... Strictly follow the rules