लॉकडाउनमध्ये या गावात चार गुंठ्यात फुलवली आमराई

patan
patan
Updated on

तारळे (जि. सातारा) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाउनचा काळ अनेकांनी विविध कारणांनी सत्कारणी लावला आहे. येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास भांदिर्गे यांनी कुटुंबीयांच्या मदतीने चार गुंठे क्षेत्रात आमराई फुलविली आहे. विशेष परिश्रम घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने झाडे वाढविली असून त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. 

दापोली येथील शासकीय रोपवाटिकेतून सहा वर्षांपूर्वी भांदिर्गे यांचा मुलगा अभय व संग्राम यांनी कलम केलेली हापूस व पायरी आंब्याची 50 रोपे आणून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतघराच्या दक्षिणेला चार गुंठे जमिनीवर लागवड केली होती. मात्र, कामांमुळे त्याकडे दुर्लक्ष झाले होते. लॉकडाउन काळात जमिनीवर गुडघ्याएवढे गवत तण वाढले होते. ते महिला कामगार व कुटुंबीयांकडून स्वच्छ करून घेतले. संग्राम व अभय यांनी कटरने झाडांची छाटणी केली. सध्या या आमराईने कात टाकली असून इतरांनी ती पाहण्यासारखी आहे. अशा प्रकारे जागतिक महामारीच्या काळात त्यांनी सकारात्मक काम करत सर्वांना प्रेरणा दिली आहे. 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कोल्हापूर माध्यमिक शिक्षण विभागात 34 वर्षे सेवा करून ते 2016 मध्ये सेवानिवृत्त झाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते जिल्हा उपाध्यक्ष आहेत. त्यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मार्गदर्शन व सहवास लाभला. त्यांना दोन वेळा आदर्श शिक्षक तालुका पुरस्कार मिळाला आहे. या आमराईच्या निमित्ताने "झाडे लावा, झाडे जगवा', असा वृक्षसंवर्धनाचा व कोरोना काळात आशावादी, सकारात्मक विचाराचा भांदिर्गे व त्याच्या कुटुंबीयांनी समाजाला संदेश दिला आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com