कऱ्हाडमध्ये दुकानदार, कामगारांसाठी ऍन्टीजेन टेस्टची सक्ती?

सचिन शिंदे 
Monday, 21 September 2020

शहरात कोरोनाच्या आकड्याने एक हजार 300 चा टप्पा गाठला आहे. त्यात कोरोना योद्‌ध्यांसह व्यापारीही बाधित झाले आहेत. अन्य नागरिकांपेक्षा व्यापारी बाधित होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचार पालिका स्तरावर सुरू आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात पालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळणाऱ्या 25 हून अधिक दुकानांचा पालिकेने सात दिवस परवाना रद्द केला आहे. पुढच्या टप्प्यात दुकानदारांसह त्यांच्या कामगारांनाही ऍन्टीजेन टेस्ट करण्याची सक्ती करण्याचा पालिका स्तरावर विचार सुरू आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन ऍक्‍शन मोडमध्ये आहे. 

शहरात कोरोनाच्या आकड्याने एक हजार 300 चा टप्पा गाठला आहे. त्यात कोरोना योद्‌ध्यांसह व्यापारीही बाधित झाले आहेत. अन्य नागरिकांपेक्षा व्यापारी बाधित होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचार पालिका स्तरावर सुरू आहे. अनेक व्यापाऱ्यांना कोरोना झाल्याची जाणीव जास्त त्रास झाल्यानंतर होते आहे. त्यामुळे दुर्दैवाने अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे.

शहरातील मृतांचा आकडाही 50 कडे सरकला आहे. युवा व्यापाऱ्यासंह ज्येष्ठ व्यापाऱ्यांचाही त्यात समावेश आहे. शनिवार पेठेत 50, सोमवार पेठे 35, मंगळवार पेठे 28, बुधवार पेठे 20, गुरुवार पेठ नऊ, शुक्रवार पेठ 35 तर रविवार पेठेत सहा रुग्ण आहेत. तर मृतांचा दर 3.28 टक्के इतका आहे. नागरी आरोग्य केंद्राकडून तब्बल चार हजार नागरिकांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यातही तब्बल दोन हजार नागरिक हाय व लोरिस्कमध्ये आहेत.

त्यात व्यापाऱ्यांची संख्या 40 टक्‍क्‍यांहून अधिक आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे येणाऱ्या नागरिकांकडून त्यांना व त्यांच्यापासून समाजात कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ती स्थिती बदलावी यासाठी पालिकेकडून पहिल्यांदा सोशल टिस्टन्सच्या कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रसार थांबविण्यासाठी दुकानदार व त्यांच्या कामगारांची ऍन्टीजेन्स टेस्ट घेण्याची पालिका स्तरावर विचार सुरू आहे. 

वस्तुस्थितीवर एक नजर... 

-रुग्णसंख्या - 1,371 
- ऍक्‍टिव्ह रुग्ण -183 
-कोरोनामुक्त संख्या - 544 
- होम आयसोलेशन रिकव्हर - 548 
- रुग्णालयात बेड नसल्याने घरी उपचार -51 
-होम आयसोलेशन ऍक्‍टिव्ह -90 
- होम आयसोलेशनला अपात्र -42 
-रुग्णालयात उपचारार्थ दाखल -51 
- कोरोनाबाधित मृत्यू -45 

संपादन : पांडुरंग बर्गे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Mandatory Antigen Test For Shopkeepers And Workers In Karad?