बंडातात्यांवर कारवाई याेग्य ठरणार नाही; 500 वारक-यांना परवानगी द्या : वारकरी संप्रदाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pandharpur Ashadhi Wari

बंडातात्यांवर कारवाई नकाे; 500 वारक-यांना परवानगी द्या

सातारा : ह.भ.प. बंडातात्या क-हाडकर मंगऴवारपासून त्यांच्या आश्रमातून निघून गेले आहेत. ते काेठे गेले आहेत याची माहिती काेणालाही नाही. दरम्यान ते फरार असल्याचे वृत्त समाज माध्यमातून पसरविण्यात आले. त्याचे खंडण बंडातात्यांच्या शिष्यगणांनी आज (बुधवार) केले आहे. दरम्यान बंडातात्यांची मागणी रास्त असून त्यांच्यावर कारवाई झाल्यास याेग्य ठरणार नाही असे वारकरी संप्रदायाने स्पष्ट केेले आहे. (satara-marathi-news-bandatatya-karadkar-permit-500-warkari-for-ashadi-wari-demadns-maharashtra-government)

दरम्यान सरकाराला निवडणुका, राजकीय मेळावे चालतात मग वारी का नाही असा प्रश्न उपस्थित करुन पायी वारीसाठी 500 च्या मर्यादित वारक-यांच्या संख्येवरती ठाकरे सरकराने निर्णय घ्यायला हवा. त्यास परवानगी द्यायला हवी अशी मागणी वारक-यांनी केली आहे.

हेही वाचा: 'सरकारचा निर्णय चुकीचा; आषाढी वारीत मोठ्या संख्येनं सहभागी व्हा'

याबाबत एका वृत्तवाहिनीशी बाेलताना संजयनाना महाराज धाेंडगे म्हणाले वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. यंदा सरकराने ही परंपरा जाेपासू द्यायला तयार नाही. अनेक वेळा बंडातात्या क-हाडकरांनी पायी वारीचा संकल्प केला आहे. सरकाराचे सर्व नियम पाळून पायी वारी तात्या करणार आहेत.

हेही वाचा: हटके ः एकरात कमावतो १५ लाख, फक्त फोन घ्यायला चार कर्मचारी!

विलासबाबा जवळ म्हणाले दाेन जूलैला आळंदीत यावा तीन जूलैला पायी वारी काढणे हा काही गुन्हा नाही. ताे त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या श्रद्धा आहे. तमाम वारक-यांची श्रद्धा आहे. एका बाजूला राजकीय मेळावे, राज्या राज्यात सभा हे सगळं काेराेनाचे नियम पायदळी तुडवून सुरु आहे. मग वारक-यांच्या पायी वारीवरती श्रद्धेला घाला का असा प्रश्न उपस्थित केला आहे. सरकाराने एका बाजूला पायी वारीसाठी 500 च्या मर्यादित संख्येवरती निर्णय घ्यायला हवा. त्यास परवानगी द्यायला हवी.

बंडातात्या क-हाडाकर हे सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या ठाकरे सरकाराने कारवाई केल्यास ते याेग्य ठरणार नाही. वारकरी संप्रदायाची भुमिका ठाम असल्याचेही संप्रदायाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Satara