esakal | न्यायालयाने तोडगा काढा सुचविल्याने कऱ्हाड पोलिसांसह पालिकेची उडाली भंबेरी
sakal

बोलून बातमी शोधा

न्यायालयाने तोडगा काढा सुचविल्याने कऱ्हाड पोलिसांसह पालिकेची उडाली भंबेरी

सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांनी थेट नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची भेट घेऊन त्यावर त्वरित बैठक घेतली. बैठकीत न्यायालयाच्या आवार व इमारती बाहेर लागणाऱ्या दुचाकी वाहनांच्या पार्किंगमुळे होणारी कोंडी दूर कशी करता येईल, याबाबत स्पष्ट चर्चा केली.

न्यायालयाने तोडगा काढा सुचविल्याने कऱ्हाड पोलिसांसह पालिकेची उडाली भंबेरी

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड : येथील न्यायालयाच्या इमारतीबाहेर दुचाकी पार्किंगमुळे होणाऱ्या वाहतुकीची कोंडी दूर करण्याची सूचना न्यायालयाने करताच त्या परिसरात नो पार्किंग करण्याचा निर्णय पालिकेने एकाच दिवसात घेतला. वाहतूक शाखा व पोलिसांची तातडीची बैठक झाली. त्यात न्यायालयाच्या आवारात तात्पुरते नो पार्किंग करण्यात आले. त्याचा पालिकेच्या मासिक बैठकीत ठराव घेऊन त्याची पूर्ण अंमलबजावणी करण्यात येईल, असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.
 
येथील न्यायालयाच्या आवाराबाहेर विविध कामानिमित्त न्यायालयात येणाऱ्या नागरिकांचे दुचाकीचे पार्किंग इमारतीबाहेर केले जाते. तो रस्ता शहरातील हमरस्ता आहे. त्यामुळे पार्किंग त्या भागातील वाहतुकीची कोंडी वाढवणारे ठरले होते. न्यायालयाची इमारत झाल्यापासून त्या भागात ती स्थिती आहे. त्यामुळे तेथे तास न तास वाहतूक कोंडी होते. नागरिकांनीही बऱ्याच तक्रारी केल्या. मात्र, त्याकडे पालिका व पोलिस लक्ष देत नव्हते. ती बिकट स्थिती लक्षात येताच आज न्यायलयाने ती गोष्ट वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील यांना बोलावून त्यावर त्वरित तोडगा काढावा, यासाठी लक्ष वेधले. थेट न्यायालयानेच त्यावर तोडगा काढण्याचे सुचविल्याने पोलिस व पालिकेची भंबेरी उडाली.

उरमोडीचे पाणी खटावला द्या अन्यथा आंदोलनास सामाेरे जा; प्रशासनाला इशारा
 
सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांनी थेट नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची भेट घेऊन त्यावर त्वरित बैठक घेतली. बैठकीत न्यायालयाच्या आवार व इमारती बाहेर लागणाऱ्या दुचाकी वाहनांच्या पार्किंगमुळे होणारी कोंडी दूर कशी करता येईल, याबाबत स्पष्ट चर्चा केली. काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या. पालिका व पोलिसांच्या पहिल्याच बैठकीत थेट त्या मुद्दावर निर्णयही झाला.

न्यायालयाच्या इमारती बाहेर नो पार्किंग झोन जाहीर करण्यात येईल, असे बैठकीत ठरले आहे, असे मुख्याधिकारी डाके यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ""न्यायालयाच्या आवाराबाहेर नो पार्किंग झोन जाहीर केले जाणार आहे. त्यासाठी पालिका बैठकीत ठराव घेऊन नंतर त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याबाबत पोलिस व पालिका संयुक्तरीत्या काम करणार आहे. तूर्त न्यायालयाने सुचविल्याने ती कोंडी दूर करण्यासाठी म्हणून त्या भागात तात्पुरते नो पार्किंग करण्यात येणार आहे. मात्र, पालिकेच्या बैठकीत ठराव पास झाल्यानंतरच त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येऊन त्याची पोलिस अंमलबजावणी करतील.''

कोरोना चाचणी केल्यासच कऱ्हाड पालिकेत प्रवेश; मुख्याधिकारी डाकेंचा सक्त आदेश

साताऱ्यात कोरोनाचा विस्फोट! जिल्हाधिकाऱ्यांनी काढला कडक निर्बंधाचा आदेश; जाणून घ्या काय सुरु, काय बंद..

Edited By : Siddharth Latkar

loading image